हरियाणा निवडणुकीबाबत कुस्तीपटू विनेश फोगट पहिल्यांदाच स्पष्टच बोलली
schedule31 Aug 24 person by visibility 296 categoryदेश
चंदीगढ - भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट भारतात परत आल्यापासून ती राजकारणा सक्रीय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कारण हरियाणा राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेसकडून तिला उमेदवारी मिळू शकते अशा चर्चा सुरू आहेत या पार्श्वभूमीवर तिने आतापर्यंत या विषयावर मौन धारण केले होते. मात्र शनिवारी ती शंभू बॉर्डरवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांच्य भेटीसाठी तेथे गेली. यावेळी तिला विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर निवडणुकांशी आपल्याला काही देणेघेणे नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
हरियाणाच्या निवडणुकीबाबत प्रश्न विनेशला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना ती म्हणाली मी निवडणुकीच्या संदर्भात काही बोलणार नाही. मी राजकारणाविषयीही काही बोलणार नाही. मी आपल्या कुटुंबाकडे परत आली आहे. तुम्ही या विषयावर बोलाल तर याचा संघर्ष आणि लढा वाया घालवत आहात.
विनेश पुढे म्हणाले की मी तुम्हाला आवाहन करते. मी खेळाडू आहे, मी संपूर्ण देशाची आहे. कोणत्या एका राज्यात निवडणूक होत असेल तर त्यामुळे मला काही फरक पडत नाही. मला फक्त एवढेच समजते की आज देशातील शेतकरी अडचणीत आहे. सरकारने त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत.