SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईव्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंदठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधीकोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणीपदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणगोकुळ निवडणुकीत मंत्र्यांच्या मुलाविरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र मैदानात; शशिकांत खोतांचा जोरदार हुंकार!शिक्षकांच्या अन्यायाविरोधात रोष! पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’चा बहिष्कारथकबाकीदारांना नोटिसा बजावून वसुली करा, अन्यथा मिळकतींवर बोजा नोंदवा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडरग्गेडियनच्या ‘रंगताली’ दांडिया-गरबा नाईटला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

गोकुळ निवडणुकीत महायुतीच सरशी ठरणार; खासदार धनंजय महाडिकांचा दावा

schedule30 Aug 26 person by visibility 499 categoryराजकीय

कोल्हापूर : आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीचाच मोठा वरचष्मा राहील आणि गोकुळची ही निवडणूक महायुती म्हणून लढवून २५ विरुद्ध शून्य असाच विजय मिळवला जाईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आगामी राजकीय समीकरणांवर भाष्य केले.

विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जसा १० पैकी १० आमदार महायुतीचे आले आणि १०-० असा स्कोअर राहिला, अगदी तसाच गोकुळमध्येही २५ च्या २५ जागा महायुतीच्याच येतील आणि महाविकास आघाडीचा स्कोअर शून्य राहील, असा दावा खासदार महाडिक यांनी केला. निवडणुकीचे राजकारण तापले असून अनेक तक्रारी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्या, तरी गोकुळमधील सभेचे सभासद आणि ठरावधारक मोठ्या संख्येने महायुतीच्या पाठीशी आहेत.

सध्या काही विरोधक सोबत येण्याच्या गोष्टी करत असले तरी, राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. परंतु, गोकुळ निवडणुकीत एकदम असे बदल होणे कठीण आहे. पाच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि सत्तेची सूत्रे असतानाही विरोधकांनी दमदाटी करून कसेतरी पॅनेल बनवले होते आणि अतिशय कमी मतांनी पराभव केला होता. आता तीच महाविकास आघाडी समविचारी आघाडी म्हणून विरोधात उभी ठाकणार असली, तरी महायुती एकजुटीने ही निवडणूक लढवून बाजी मारेल.
गोकुळ निवडणुकीतील विविध घडामोडींवर आणि जागावाटपावर महायुतीचे नेते लवकरच योग्य तो निर्णय घेतील आणि एक, दोन दिवसांत निवडणुकीच्या अधिकृत भूमिका स्पष्ट केल्या जातील, असेही खासदार महाडिक यांनी शेवटी स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes