SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगेलाटकरांना लावला गुलाल, ऋतुराज पाटील यांना घेतले खांद्यावर मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश; सतेज पाटील यांनी घेतला आढावाराजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थापविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदानविधानसभा निवडणूक 2024: बीडचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या धक्क्याने निधनकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदानकोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे मतदान; जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदानजिल्ह्यातील 3452 केंद्रांवर मतदान; मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र देवून सन्मानदिव्यांगांचा मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

पंचगंगा स्मशानभुमी येथील दानपेटीत 3 लाख 86 हजार जमा

schedule11 Apr 23 person by visibility 999 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  :कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभुमी आहेत. या ठिकाणी  महापालिकेच्यावतीने  मोफत  अंत्यसंस्कार  करण्यात  येतात.  पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी  गुप्तदान  पेटया  ठेवण्यात  आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविर्सजनासाठी येणारे नागरीक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात.  या गुप्तदान  पेटया दरवर्षी मार्च अखेरीस  उघडण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदान पेटी मंगळवारी सहाय्यक आयुक्त डॉ.विजय पाटील, वरिष्ठ  लेखापरिक्षक दिपक कुंभार,  सहा.आरोग्य  निरीक्षक  (स्मशान) सौरभ घावरी, आरोग्य निरिक्षक महेश भोसले  यांच्या उपस्थितीत  उघडण्यात आली. या दानपेटीमध्ये रु.3,86,224/- इतकी रक्कम जमा झालेली आहे.

यापुर्वी माहे मार्च 2022 मध्ये स्मशानभूमीकडील  दानपेटी  उघडण्यात आल्या होत्या. यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीकडे  तब्बल रु.4,95,317/- इतकी रक्कम दान स्वरुपात दानपेटीत प्राप्त झालेली होती.

 स्मशानभूमीकरिता दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, नागरिक यांचेकडून शेणी, लाकूड दान करणेस मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळतो.त्याचबरोबर दानपेटीतही प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे.याबद्दल सर्व दानशूर व्यक्तींची महानगरपालिका आभारी  आहे.

Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes