SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगेलाटकरांना लावला गुलाल, ऋतुराज पाटील यांना घेतले खांद्यावर मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश; सतेज पाटील यांनी घेतला आढावाराजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थापविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदानविधानसभा निवडणूक 2024: बीडचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या धक्क्याने निधनकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदानकोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे मतदान; जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदानजिल्ह्यातील 3452 केंद्रांवर मतदान; मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र देवून सन्मानदिव्यांगांचा मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

आनंदी तणावमुक्त जीवनासाठी चांगले शरीर व मन महत्वाचे : डॉ. मनिषा भोजकर; गोकुळमार्फत सहकार सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

schedule19 Nov 24 person by visibility 165 categoryउद्योग

कोल्‍हापूर : आपले शरीर चांगले असेल तर मन चांगले राहते आणि मन चांगले असेलतर जीवन तणावमुक्त होऊन आपण आनंदी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेद कन्सल्टंट, कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट, व्याख्याती आणि लेखिका डॉ. मनिषा भोजकर यांनी केले.  ७१ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्ताह अंतर्गत ‘आनंदी तणावमुक्त जीवन’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 त्या म्हणाल्या की, आपल्या जगात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनात अगणित ताण तणावांस प्रत्येकास सामोरे जावेच लागते. परंतु, त्याची तीव्रता कमी करून जीवन सुसह्य करण्यासाठी येणारे ताणतणाव जाणून घेऊन त्याला सामोरे गेल्यास तसेच योग्य व्यायाम, सात्विक आहार, शांत झोप, मनशांती, उत्तम सूर्यप्रकाश, संगीत, हसणे, निसर्गात वावरणे, समाज्यासाठी जगणे व आई-वडिलांचा चेहरा नेहमी आनंदी ठेवल्यास आपण सर्वजण आनंदमय तणावमुक्त जीवन जगू शकतो असे मार्गदर्शन केले व गोकुळने कोल्‍हापूर जिल्ह्यातील महिला दूध उत्पादकांना अर्थिक स्‍थैंर्य देण्याचे काम केले असून गोकुळचे कार्य व व्‍यवस्‍थापन बघून आपण भारावून गेलो असल्याचे मनोगत व्‍यक्‍त केले.

दरवर्षीप्रमाणे गोकुळ दूध संघा व जिल्हा सहकार बोर्ड यांच्यातर्फे गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्‍या आवारात सहकार सप्‍ताह निमित्‍त व्याख्यान आयोजित करणेत आले होते. या कार्यक्रमाचे दिपप्रज्‍वलन डॉ. मनिषा भोजकर, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व अधिकारी यांचे हस्‍ते करण्यात आले.

 या कार्यक्रमाचे स्‍वागत व प्रास्‍ताविक निता कामत यांनी केले व आभार मृण्मयी सातवेकर यांनी मानले तसेच सूत्रसंचालन डॉ.एम.पी.पाटील यांनी केले.

  याप्रसंगी संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, जिल्हा सहकार विकास अधिकारी बी.जी.साळोखे, तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रा.एस.टी.जाधव, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही.तुरंबेकर, दत्तात्रय वागरे, डॉ.प्रकाश दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, महिला नेतृत्‍व विकास अधिकारी निता कामत, संपदा थोरात तसेच संघाचे अधिकारी, कर्मचारी व महिला स्वयंसेविका उपस्थित होत्‍या.

Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes