विधानसभा निवडणूक-2024 : के.एम.टी. उपक्रमामार्फत मतदार जनजागृती उपक्रम
schedule13 Nov 24 person by visibility 195 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 कामी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत मतदारांना जनजागृती करणेकरिता “मतदानासाठी वेळ काढा आणि आपली जबाबदारी पार पाडा”हा उपक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., सहा.आयुक्त तथा अति.परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, वरिष्ठ लेखापरिक्षक वर्षा परिट यांचे प्रमुख उपस्थितीत श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत बसमध्ये मतदारांना प्रबोधन करणेकरिता स्टीकर्स लाऊन प्रवासी नागरिकांना मतदान करणेकामी प्रबोधन करणेत आले.
यावेळी परिवहन उपक्रमाकडील कामगार अधिकारी प्रदिप म्हेतर, वाहतूक निरीक्षक सुनिल जाधव , आर.एस.धुपकर, इश्यु कॅश अधिक्षक नितीन पोवार, स्थानक प्रमुख संग्रामसिंह काशीद, सहा.वाहतूक निरीक्षक एस.के. आकिवाटे, आर.एस. सुर्यवंशी, अपघात प्रमुख एन.एस. काळे, वाहतूक नियंत्रक एस.पी.सरनाईक, पी.बी.साबळे तसेच वाहतूक विभागाकडील चालक – वाहक कर्मचारी व प्रवासी नागरिक उपस्थितीत होते.