हातकणंगले तालुक्यातील डी.एम. गँग सहा महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
schedule31 Oct 24 person by visibility 265 categoryगुन्हे
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील " डी.एम. गँग' सहा महिन्या करीता कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले यामध्ये दस्तगीर महालिंगपुरे, संतोष गोसावी, विलास मिसाळ यांचा समावेश आहे.
हातकणंगले शहर व हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्हयाचे परिसरामध्ये सार्वत्रिक हितास बाधक अशा स्वरुपाचे गुन्हयांना परिणाम देणाऱ्या "डी.एम गैंग "या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख १) दस्तगीर हसन महालिंगपुरे, रा. जवाहरनगर इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. व टोळीचे सक्रिय सदस्य २) संतोष कृष्णा गोसावी, रा. गल्ली न.९ जयसिंगपूर, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर. ३) विलास ज्ञानु मिसाळ, रा. कुंभोज ता. हातकणंगले जि. कोल्हापूर. यानी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ पुनःप्रस्थापित करण्यासाठी, पोलीस निरीक्षक, हातकणंगले पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपारीच प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी, महेंद्र पंडित यांचेकडे सादर केला होता.
कोल्हापूर जिल्हयाचे हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सारे यांनी सदरच्या प्रस्तावांची निःपक्षपातीपणे चौकशी होणे करीता चौकशी अधिकारी म्हणुन उप विभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी विभाग यांची नियुक्ती केली होती. त्यानी चौकशीअंती अहवाल हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांचेकडे सादर केला होता. चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर वेळावेळी हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांचे समक्ष घेणेत आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजु माडंणेसाठी नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी दिला होता. घेणेत आलेल्या सुनावणीमध्ये, त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातुन टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजविणे व सामाजीक स्वस्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरीकांचे जिवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रीक हित लक्षात घेवुन, हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिनांक २९ ऑक्टोंबर रोजी "डी.एम. गैंग" या टोळींचे प्रमुखासह ३ इसमांना कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतुन सहा महिन्याचे कालावधी करीता हद्दपारीचे आदेश पारित केले. पारित केलेल्या आदेशाची हातकणंगले पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक यांनी अमंलबजावणी केली.
हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणाला दिसून आल्यास नजीकचे पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.