कोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारीही वेळाने हजर झालेल्या 68 सफाई कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात; प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून कारवाईचा धडाका सुरुच...
schedule24 Oct 24 person by visibility 1455 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : मंगळवारपासून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये सुधारणा होण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून सकाळी फिरती करुन सलग दोन दिवस कारवाई करण्यात येत आहे. प्रशासकांकडे शहरातील कच-याच्या तक्रारी वाढत असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे. गेले दोनदिवसाच्या कारवाईमुळे आरोग्य विभागाच्या यंत्रणा खडबडीत जागी झाली असून कामामध्ये बरीचशी सुधारणा झाली आहे.
आजही अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त व सहा.आयुक्तांनी सकाळी फिरती करुन तपासणी केली असता, ए-1, सी-1, सी-2, डी वॉर्ड व ई-3 मधील 68 सफाई कर्मचारी वेळाने आलेने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे. तसेच वर्कशॉप येथे 7 ड्रायव्हर वेळाने त्यांचेही एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी गेले दोन दिवसात 101 कर्मचा-यावर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे प्रमाणिकपणे काम करणा-या कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले असून कामामध्ये हलगर्जी करणा-या इतर कर्मचा-यांना चाप बसला आहे.
या कारवाईमुळे शहरातील बराचसा कचरा उठाव झाल्याने नागरीकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. गुरुवारीही अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील व सहा.आयुक्त नेहा आकोडे, स्वाती दुधाणे, संजय सरनाईक यांनी आपआपल्या विभागीय कार्यक्षेत्रामध्ये सकाळी 6 वाजता फिरती करुन हजरी ठिकाणी व प्रभागात कर्मचारी हरज आहे का नाहीत याची तपासणी केली. यावेळी 63 सफाई कर्मचारी वेळाने कामावर आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यावर आज कारवाई करुन एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले.
त्याचबरोबर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी मंगळवारी शास्त्रीनगर येथील वर्कशॉपमध्ये ज्या तीन आयशर गाडया कित्येक दिवस किरकोळ कारणामुळे बंद होत्या त्याही दुरुस्त करुन भागात फिरतीसाठी कमाला लावल्या आहेत. यापुढेही वरिष्ठ अधिका-यांच्या तपासणी सुरु राहणार आहे.