SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगेलाटकरांना लावला गुलाल, ऋतुराज पाटील यांना घेतले खांद्यावर मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश; सतेज पाटील यांनी घेतला आढावाराजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थापविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदानविधानसभा निवडणूक 2024: बीडचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या धक्क्याने निधनकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदानकोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे मतदान; जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदानजिल्ह्यातील 3452 केंद्रांवर मतदान; मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र देवून सन्मानदिव्यांगांचा मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर महानगरपालिका : देखभाल दुरुस्ती कालावधीतील ठेकेदार एक वर्षासाठी ब्लॅकलिस्ट

schedule30 Oct 24 person by visibility 229 categoryमहानगरपालिका

* प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्ते कामाचा आढावा

कोल्हापूर : विभागीय कार्यालय क्र.1अंतर्गत रचनाकार हौसिंग सोसायटी येथील देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्तेचा ठेकेदार कृष्णा खाडे याला एक वर्षासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी ब्लॅकलिस्ट केले आहे. सदरचा ठेकेदाराने महापालिकेची नोटीस न स्विकारणे, महापालिकेस कामाबाबत प्रतिसाद न देणे, रस्ते सुस्थित असलेबाबत खोटे प्रतिज्ञापत्र दिलेबद्दल सदरची ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज आयुक्त कायालयात आढावा घेतला. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सहा.आयुक्त नेहा आकोडे, स्वाती दुधाणे, संजय सरनाईक, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, उपशहर अभियंता सुरेश पाटील, आर के पाटील, महादेव फुलारी, रमेश कांबळे आदि उपस्थित होते.

 यावेळी प्रशासकांनी चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत काढण्यात आलेल्या नोटीसा व केलेल्या कार्यवाहीची माहिती सर्व उप-शहर अभियंता यांच्याकडून घेतली. यामध्ये सर्व विभागीय कार्यालय अंतर्गत खराब रस्तेंचे कामाबाबत नोटीसा काढण्यात आल्या असून देखभाल दुरुस्ती कालावधीतील ठेकेदारांना ब्लॅकलिस्टचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर आतापर्यंत वारंवार सूचना देऊनही सर्व रस्ते दुरुस्त करुन घेतले नसलेने उप-शहर अभियंता महादेव फुलारी व रमेश कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना दिल्या. तसेच विभागीय कार्यालय क्र.1 ला पॅचवर्कसाठी दिलेला निधीतील कामे अजूनही पुर्ण झाली नसल्याने प्रशासकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जी कामे बरेच दिवस झाले मंजूर करुन आचारसंहितेपुर्वी वर्क ऑर्डर दिलेली नाहीत अशा कामांची फाईल कोठे कोठे प्रलंबीत आहेत याची तपासणी करुन ज्या कनिष्ठ लिपीक, कनिष्ठ अभियंता, उप-शहर अभियंता व शहर अभियंता यांचेकडे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आलेस त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना दिल्या.

 पाऊस थांबल्याने तातडीने गर्दीच्या ठिकाणांचे रस्ते पुर्ण करुन घ्या. विभागीय क्षेत्रीय अधिकारी उपआयुक्त व सहा.आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रात प्राधान्याने कामे करुन घ्यावीत अशा सूचना केल्या.

▪️विभागीय कार्यालय अधिक सक्षम करा
 आरोग्य विभागाच्या कामामध्ये बरीच सुधारणा झाली असून अजूनही सुधारणा करावी. वर्कशॉपमधून टिप्पर सकाळी 6 पर्यंत बाहेर काढून प्रभागात पोहचवा. टिप्पर गाडया धुण्यासाठी झुम येथे लवकरात लवकर व्यवस्था करा. फिरतीवेळी कचरा रस्तेवर आढळलेस आरोग्य निरिक्षक व मुकादमांवर दंडात्मक कारवाई करा. आरोग्य व रस्तेंबाबत नागरीकांच्या जास्त तक्रारी असून त्या विभागीय कार्यालय स्तरावरच निर्गत झाल्या पाहिजेत. यासाठी विभागीय कार्यालय अधिक सक्षम झाली पाहिजेत. विभागीय क्षेत्रीय अधिकारी उपआयुक्त, सहा.आयुक्त, उप-शहर अभियंता, आरोग्य विभाग यांचेमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.

Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes