नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन कोल्हापूर शाखेची सभा उत्साहात; अध्यक्षपदी डाॅ. मुकुंद मोकाशी,सचिवपदी डाॅ. राजेंद्र सोनवणे
schedule01 Oct 24 person by visibility 351 categoryआरोग्य
कोल्हापूर : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन कोल्हापूर शाखेची द्विवार्षिक सर्वसाधारण सभा शास्त्रीनगर येथील भवन मध्ये खेळीमेळीत नुकतीच संपन्न झाली. या सभेत अध्यक्ष डाॅ.मुकुंद मोकाशी यांनी मागील दोन वर्षांपासूनचा कार्यक्रम अहवाल व आर्थिक अहवाल वाचन केले .त्यास सर्वानी
मंजूरी दिली.आणि सर्वानुमते २०२४ ते २०२६ कालावधीपर्यंत पुढील कार्यकारिणी निवडण्यात आली.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ही संपूर्ण भारतभर असणारी संमिश्र प्रॅक्टिशनर म्हणजेच ऍलोपॅथी आणि आयुर्वेद या दोन्हींची प्रॅक्टिस करणाऱ्यांची संघटना आहे. कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी डाॅ.मुकुंद मोकाशी,सचिवपदी डाॅ.राजेंद्र सोनवणे.कोषाध्यक्षपदी डाॅ.राजेश कुंभोजकर यांची निवड करण्यात आली कार्यकारिणीतील इतर सदस्य व पदाधिकारीही नियुक्त करण्यात आले.
यामध्ये व्हाईस प्रेसिडेंटपदी डॉ. नितीन देशपांडे, डॉ मिलिंद कुलकर्णी, जॉइंट सेक्रेटरीपदी डॉ विनायक शिंदे जॉईंट ट्रेझररपदीडॉ चंद्रकांत सोनवणे, लीगल ॲडव्हायझरपदी डॉ प्रदीप देसाई, प्रोग्रॅम अँड कल्चरल सेक्रेटरी म्हणून डॉ. अनिता सोनवणे, डॉ अपर्णा जाधव,डॉ उज्वला देसाई,डॉ रसिका देशपांडे, यांची निवड करण्यात आली तर एक्झिक्यूटिव्ह मेंबरमध्ये डॉ सुचित्रा माने,डॉ रवींद्र केसरकर,डॉ मधुरा कुलकर्णी,डॉ साक्षी देसाई यांची निवड तर ॲडव्हायझरी मेंबर्समध्ये डॉ शरद टोपकर,डॉ प्रकाश ओसवाल, डॉ राजेंद्र वायचळ,डॉ विलास बुरांडे,स्टेट कौन्सिल मेंबरमध्ये डॉ प्रदीप देसाई,डॉ रवींद्र जामदार, डॉ राजेंद्र वायचळ, डॉ शितल देशपांडे आदींची निवड करण्यात आली आहे.