ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
schedule16 Oct 24 person by visibility 267 categoryदेश
नवी दिल्ली : ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सुरेंद्र चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाच वर्षांनी जम्मू-काश्मीरमध्ये नवे सरकार स्थापन झाले आहे. आज 16 ऑक्टोबर रोजी ओमर अब्दुल्ला यांना लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अब्दुल्ला सरकारमध्ये चार कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये जावेद दार, सकिना इट्टू, जावेद राणा आणि सतीश शर्मा यांचा समावेश आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा, जेकेएनसी प्रमुख फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती, आप नेते संजय सिंह, सीपीआय नेते डी राजा आघाडीचे इतर नेते येथे उपस्थित होते.
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाली नाही, बाहेरून पाठिंबा देत आहे. वृत्तानुसार, यामागे दोन कारणे दिली जात आहेत. पहिली म्हणजे काँग्रेसला ओमर अब्दुल्ला सरकारमध्ये दोन मंत्रीपदे हवी होती. मात्र उमर एकच पद देण्यास तयार होते. त्यामुळे काँग्रेसने सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
ओमर अब्दुल्ला यांचा मंत्रिमंडळात समावेश न करण्याबाबत जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची जोरदार मागणी केंद्राकडे केली आहे. पंतप्रधानांनीही हेच आश्वासन जाहीर सभांमध्ये वारंवार दिले आहे. मात्र जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला नाही. ज्याच्या निषेधार्थ काँग्रेस मंत्रिमंडळात सहभागी होत नाही. काँग्रेस अध्यक्ष पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी लढा सुरूच ठेवेल.