करवीर कोल्हापूर तहसील माहेश्वरी समाजाच्या वतीने 'ई मतदार प्रतीज्ञा' पत्रे भरून १०० टक्के मतदानाचा निर्धार व्यक्त
schedule11 Nov 24 person by visibility 164 categoryसामाजिक
कोल्हापूर : येथील व्हीनस कॉर्नर परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिर सभागृहात संपन्न झालेल्या करवीर कोल्हापूर माहेश्वरी समाजाच्या स्नेह मेळाव्यात उपस्थित असलेल्या 234 मतदारांनी ई मतदार प्रतिज्ञापत्र भरून 100 टक्के मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला . येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे नोडल अधिकारी नीलकठं करे यांच्या आहवानास प्रतिसाद देत ही मोहीम आम्ही राबवली असून आगामी काळात विविध ठिकाणी ही ' ई मतदार प्रतिज्ञा 'पत्र भरण्यासाठी विशेष मतदान जनजागृती मोहीम राबवणार असल्याचेही यावेळी अध्यक्ष संजय सारडा यांनी सांगितले .
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने आपणास मतदानाचा पवित्र हक्क दिला आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वांनी महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा हा सर्वाधिक टक्केवारीने मतदान करणारा जागृत जिल्हा म्हणून ओळखला जातो. हीच परंपरा पुढे नेण्यासाठी ई मतदार प्रतिज्ञा द्वारे पुरक प्रबोधन करावे. असे आहवान माजी अध्यक्ष मनिष झंवर यांनी केले केले. प्रत्येकाला आपल्या मोबाईल फोनवर थेट जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल एडगे यांच्या स्वाक्षरीचे ही मतदार प्रतिज्ञापत्र मिळते या संदर्भातील अगदी सोपी सहा टप्प्यातील सहा पायऱ्यांमधील ही प्रक्रीया पत्रकार आरोग्यमित्र राजेंद्र मकोटे यांनी यावेळी मोबाईल फोनवर प्रत्यक्ष सर्वांना दाखवली . त्या नंतर असे प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांनी आपल्या मोबाईलवर मिळालेले प्रमाणपत्र दाखवून 100% मतदानाचा पुन्हा एकदा निर्धार व्यक्त केला . यावेळी सौ ममता झंवर यांनी ही मार्गदर्शन केले . यावेळी त्यांनी ज्ञान प्रबोधनपर विविध उपक्रम ही सांगितले .
या कार्यक्रमाचे संयोजन माहेश्वरी समाजाचे संचालक बलदवा तोतला बियाणी मंडोवरा सारडा यांनी केले . यावेळी रेल्वे सल्लागार समिती सदस्य - अभ्यासक शिवनाथ बियाणी सह माहेश्वरी समाज सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते .