SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगेलाटकरांना लावला गुलाल, ऋतुराज पाटील यांना घेतले खांद्यावर मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश; सतेज पाटील यांनी घेतला आढावाराजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थापविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदानविधानसभा निवडणूक 2024: बीडचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या धक्क्याने निधनकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदानकोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे मतदान; जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदानजिल्ह्यातील 3452 केंद्रांवर मतदान; मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र देवून सन्मानदिव्यांगांचा मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

शासनाकडून मिळालेल्या शेतजमिनीच्या पैशाच्या वाटणीवरुन राडा; भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा खून; पन्हाळा तालुक्यातील आवळी येथील घटना

schedule14 Mar 22 person by visibility 98 categoryगुन्हे

पन्हाळा : शासनाकडून मिळालेल्या शेतजमिनीच्या पैशाच्या वाटणीवरुन आवळी पैकी पोवारवाडी येथे झालेल्या मारहाणीत भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा खून झाला आहे. रघुनाथ ज्ञानू पोवार (वय ७०, आवळी पैकी पोवारवाडी) असे मृत मामाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी प्रविण सुभाष पाटील, प्रदीप विश्वास पाटील, विश्वास बाबुराव पाटील (तिघे, रा. आवळी पैकी पोवारवाडी) आणि दिलीप शामराव गराडे (रा. पैजारवाडी) या चौघांना कोडोली पोलीसांनी अटक केली आहे. 

 भगवान महादेव पाटील आणि संशयित आरोपी प्रविण पाटील, प्रदीप पाटील, विश्वास पाटील हे एकाच गावातील असून एकमेकाच्या घरासमोर राहतात. यांच्यामध्ये गट नंबर ७४१ (अ) मधील कोल्हापूर –रत्नागिरी रोडसाठी भुसंपादित जमिनीला शासनाकडून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन गेले पंधरा दिवसापासून वाद सुरु होता. रविवारी (दि.१३) भगवान पाटील हे रात्री साडेनऊच्या सुमारास घराचे दारात हातपाय धुत असताना संशयित आरोपी प्रविण पाटील याने शिवीगाळ करुन भगवान पाटील यांना काठीने मारहाण केली. हा वाद ऐकून त्यांची पत्नी व मामा रघुनाथ ज्ञानु पोवार भांडण सोडविण्यासाठी गेले असता सर्व संशयित आरोपींनी रघुनाथ पोवार यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये रघुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर जखमी भगवान पाटील यांनी कोडोली पाटील ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत संशयित आरोपींना अटक केली आहे.

Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes