राज्यात विश्वासाचे सरकार आम्ही देणार : आमदार सतेज पाटील; महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ पाचगाव येथे सभा
schedule15 Nov 24 person by visibility 201 categoryराजकीय
कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये आज विश्वासघातकी सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार माध्यमातून विश्वासाचे सरकार आम्ही देणार आहोत. त्यामुळे विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पाचगाव येथे सभा झाली त्याप्रसंगी आमदार सतेज पाटील बोलत होते. काँग्रेसचे निरीक्षक व उत्तराखंड येथील आमदार काझी निझामुद्दीन यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सतेज पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका होतील का नाही अशी शंका लोकांना वाटत होती. परंतु तुमच्या आमच्या सुदैवाने या निवडणुका लागल्या. आणि आता या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला आपलं सरकार आणायचा निर्धार करता आला. आपलं सरकार महाविकास आघाडीचे या राज्यामध्ये आणण्यासाठी सगळेजण सज्ज झाले आहेत.
मी आज जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये फिरतोय लोकांचा प्रचंड उत्साह आहे. लोक वाट बघतायेत कधी एकदा आम्ही मतदानापर्यंत जातोय मतदान करतोय कारण की गेल्या तीन वर्षांमध्ये भाजपचं सरकार या राज्यांमध्ये कसं आलं तुम्हाला माहिती आहे. आपण टीव्हीवर बघितलं सुरत मार्गे गोहाटी असं चित्र महाराष्ट्राने कधी बघितलं नव्हतं आम्ही जे आमदारांना निवडून देतो आम्ही जे आमच्या लोकांना मतं टाकतो ते एका रात्रीत ४०-४० लोकं फुटतात बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला पक्ष फोडून घेऊन जातात. शरद पवार यांनी उभा केलेला पक्ष फोडतात यामुळे महाराष्ट्रातली जनता म्हणते विश्वास कुणावर ठेवायचा जर आमचा आमदारच पळून जात असेल आमचा खासदार पळून जात असेल पक्ष फोडून भाजपची मंडळी या महाराष्ट्राचं जे काय इमेज आहे. ती इमेज खराब करण्याचा प्रयत्न करत असतील त्या व्यवस्थेमध्ये आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. म्हणून आज ही निवडणूक महत्त्वाच्या एवढ्यासाठीच एका बाजूला अविश्वासाचा एक सरकार आहे विश्वासघातकी सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या माध्यमातून विश्वासाचे सरकार आम्ही देणार आहोत हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो.
कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील व कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर यांना निवडून देण्यासंबंधी आवाहन त्यांनी केले. तसेच काँग्रेसच्या महाराष्ट्रनामा वचननामामधील विविध योजनांची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. यावेळी पाचगाच्या सरपंच प्रियांका पाटील, माजी नगरसेवक सुनील मोदी, युवराज गवळी आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.