स्टार एअरची कोल्हापूर- अहमदाबाद थेट विमानसेवा २८ ऑक्टोबर पासून
schedule25 Oct 24 person by visibility 437 categoryक्रीडा
कोल्हापूर : भारत क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी वाढणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल स्टारने उचलले असून कोल्हापूर आणि अहमदाबाद यांच्यातील नवीन थेट विमानसेवा २८ ऑक्टोबर पासून सुरू होईल, अशी घोषणा केली आहे.
नवीन कोल्हापूर-अहमदाबाद मार्ग विविध प्रवाशांना, जसे की व्यावसायिक, पर्यटक आणि तीर्थयात्री, लाभ देईल. यामुळे प्रवाशांचा वेळ कमी होईल आणि प्रादेशिक व्यापार, वाणिज्य आणि पर्यटनाला चालना मिळेल.
"आम्ही या नवीन मार्गाची सुरुवात करण्यात आनंदित आहोत. जेणेकरून क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी वाढवण्यात आमची वचनबद्धता बळकट होईल, असे स्टार एअरचे CEO कैप्टन सिमरन सिंग तिवाना म्हणाले, "कोल्हापूर आणि अहमदाबाद है सांस्कृतिकदृशया समृद्ध शहर आहेत, ज्यांचे आर्थिक महत्त्व वाढत आहे. हा हवाई प्रवास सुलभ करणार आहे. आणि दोन्ही प्रदेशांतील जार्थिक विकास व पर्यटनाला जालना देईल."
यावर्षी कोल्हापूर-आहमदाबाद मार्गासाठी तिकिटे आजपासून स्टार एअरच्या अधिकृत वेबसाइटवर www.starair.in उपलब्ध आहेत. याशिवाय, प्रारंभिक बुकिंगसाठी आकर्षक उद्घाटन दरही ऑफर करण्यात आले आहेत.