SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगेलाटकरांना लावला गुलाल, ऋतुराज पाटील यांना घेतले खांद्यावर मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश; सतेज पाटील यांनी घेतला आढावाराजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थापविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदानविधानसभा निवडणूक 2024: बीडचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या धक्क्याने निधनकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदानकोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे मतदान; जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदानजिल्ह्यातील 3452 केंद्रांवर मतदान; मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र देवून सन्मानदिव्यांगांचा मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

उदारमतवादी, लोकशाहीवादी पहिले पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू

schedule14 Nov 24 person by visibility 178 categoryसामाजिक

आज १४ नोव्हेंबर: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस "बालदिन" म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने...

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले आणि सर्वाधिक काळ सेवा देणारे लोकप्रिय पंतप्रधान होत. त्यांच्या दूरदृष्टीचे प्रत्यंतर सर्व भारतीयांना आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ लढ्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे, त्यासाठी त्यांनी अनेकदा तुरूंगवास भोगला. राष्ट्र उभारणीवर दृढ विश्वास ठेवणारे व आपल्या देशाच्या विकासासाठी ते अहोरात्र झटले होते, 

 परदेशात शिक्षण घेत त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे ते अगदी जवळचे विश्वासू सहकारी होते. स्वातंत्र्योतर भारतात विविध शैक्षणिक संस्था, पोलाद प्रकल्प आणि धरण उभारणी करून त्यांनी भारताच्या  व्यापक विकासाची मुहूर्तमेढ रोवली. आज देशाला सर्व क्षेत्रात जी स्वायत्तता व आत्मनिर्भरता प्राप्त झाली आहे, त्याचे सर्व श्रेय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कडे जाते.

  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंची पहिली वचनबद्धता भारताला स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था बनवण्याची होती. परिणामी, त्यांनी आधुनिक शिक्षणाची मंदिरे आणि विशाल सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची स्थापना केली जी वाढत्या राष्ट्राच्या आणि तेथील लोकांच्या गरजा पूर्ण करतात. उच्च शिक्षण केंद्रे स्थापन करण्याच्या त्यांच्या आवेशातून वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. अनेक भारतीयांचा असा विश्वास आहे की भारत एक दोलायमान लोकशाही, एक औद्योगिक शक्तीगृह, एक ज्ञान भागीदार, जागतिक स्तरावर प्रतिष्ठित लष्करी शक्ती आणि तंत्रज्ञान आणि अंतराळातील नवोन्मेषक, याचे श्रेय नेहरूंना गेले पाहिजे;  त्यांचे कारण असे की,त्यांनी देशाचा मजबूत पाया घातला होता. ते देशातील मुलांना  'भावी नागरिक' म्हणून प्रेरित करतात. मुलांनी त्यांना चाचा (काका) नेहरू म्हणून गौरवले, म्हणूनच त्यांचा १४ नोव्हेंबर हा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.  

  ते उदारमतवादी आणि मनाने खरे लोकशाहीवादी होते, आज काॅंग्रेसविरोधी शक्ती विविध मार्गांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्याबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, विशेष म्हणजे देशाप्रती असणारे त्यांचे निस्सीम प्रेम, अद्वितीय त्याग तसेच देश विकासाचा घेतलेल्या ध्यास व त्यासाठी केलेली प्रयत्नाची पराकाष्ठा, शिवाय असिम दूरदृष्टी याचा देशपरदेशात गौरव होत असतांनाही काही विघातक शक्ती त्यांच्या या कार्याचा पध्दतशीर विसर पडावा म्हणून त्यांच्यावर निराधार बेछूट आरोप करत आहेत, हे बिलकूल चुकीचे आहे, तथापि ज्यांनी त्यांच्या जीवनचरित्राचा व महान कार्याचा अभ्यास केला आहे, अशा समाजशास्त्राच्या अभ्यासकांना नेहरूविरोधक किती खोट्या, निराधार व खालच्या पातळीवर जाऊन असंस्कृतपणे टिका करतात हे समजून येते. अर्थात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे धिरोदात्त कर्तृत्व, देशासाठी केलेला त्याग व देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात टाचणी सुध्दा बनत नव्हती, व अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नव्हतो,अशा १७ वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात केलेला देशाचा  अद्वितीय व आमुलाग्र विकास कोणीही विसरू शकत नाही.

✍️ डॉ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)

 

Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes