पाच हजारांची लाच : इचलकरंजीत विज मंडळातील दोघे कर्मचारी लाचलुचपत पथकाच्या ताब्यात
schedule12 Nov 24 person by visibility 325 categoryगुन्हे
कोल्हापूर- इलेक्ट्रीक पोल वरुन मिटर पर्यत लाईट जोडण्यासाठी सात हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या विज मंडळातील कर्मचारी रज्जाक हुसेन तांबोळी (वय 50 .रा.हुसेन मंझील ,इदगाह मैदान जवळ,मिरज) आणि आकाश शंकर किटे (वय 33.रा.धुळेश्वर नगर ,कबनूर) या दोघांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडुन त्यांच्या विरोधात इचलकंरजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे इलेक्ट्रिक कॉट्रॅक्टर असून त्यांचे ग्राहक यांना पॉवर लुम सुरु करण्याचे असून त्यासाठी 26 HP चे पॉवर लुम कनेकशन मिळणेसाठी अर्ज केला होता. संबंधित कर्मचाऱ्यांनी तक्रारदार यांना इलेक्ट्रिक पोल वरून मीटर पर्यंत लाईट जोडणी साठी 7000 रु ची लाच मागणी करत असल्याची तक्रार ला प्र वी कोल्हापूर येथे प्राप्त झाली होती.
आरोपी आकाश शंकर किटे यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी आरोपी रज्जाक हुसेन तांबोळी यांचेसाठी 3000 रु ची मागणी केली. आरोपी रज्जाक हुसेन तांबोळी यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी 5000 रु ची मागणी केली. त्यानंतर आलोसे रज्जाक हुसेन तांबोळी यांनी तक्रारदार यांचेकडुन 5,000/- रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
आरोपी यांचेविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे,इचलकरंजी जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक :- आसमा मुल्ला, पोलीस निरीक्षक, पो.हे.कॉ.अजय चव्हाण, पो.हे.कॉ. सुनील घोसाळकर, पो.ना.सुधीर पाटील, पो.कॉ.कृष्णा पाटील, चा.पो.हे.कॉ.कुराडे, ला.प्र.वि.कोल्हापूर यांनी कारवाई केली.