SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’ ;१ मे २०२५ रोजी होणार प्रदर्शितकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगेलाटकरांना लावला गुलाल, ऋतुराज पाटील यांना घेतले खांद्यावर मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश; सतेज पाटील यांनी घेतला आढावाराजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थापविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदानविधानसभा निवडणूक 2024: बीडचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या धक्क्याने निधनकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदानकोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे मतदान; जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदानजिल्ह्यातील 3452 केंद्रांवर मतदान; मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र देवून सन्मान

छत्रपती शिवरायांच्या पुतळा कामास नकार देणाऱ्या महाडिकांना मते का द्यायची : पांडुरंग महाडेश्वर

schedule16 Nov 24 person by visibility 226 categoryराजकीय

कोल्हापूर : निगवे खालसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक, खा.धनंजय महाडिक व शौमिका महाडिक यांचेकडे गेलो असता त्यांनी या कामासाठी नकार दिला. मात्र आमदार सतेज पाटील यांनी लोकवर्गणीतून उभारल्या जाणाऱ्या छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास परवानगी मिळवून ते काम पूर्ण करण्यासाठी मदतही केली. छ. शिवरायांच्या पुतळा कामास नकार देणाऱ्या महाडिकांना मते का द्यायची? असा सवाल माजी सरपंच पांडुरंग महाडेश्वर यांनी केला. महाडिकांनी 40 वर्षे केवळ आमचा वापर करुन घेतला अशी टीकाही त्यांनी केली. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ निगवे खालसा येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आमदार सतेज पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात आ.ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भरीव काम केले आहे. कोणीही काम घेऊन आले तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. सर्वसामान्यांमध्ये मिसळून कामे करणारा आमदार तुम्हांला मिळाला आहे. ऋतुराज पाटील हे आमचे आमदार आहेत हे तुम्ही अभिमानाने सांगू शकता.

बाजार समिती संचालक सुयोग वाडकर म्हणाले, आ.ऋतुराज पाटील यांचे नाणे खणखणीत आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ओबीसी संघटनेने आमदार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा जाहिर केला.

पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचे पक्ष निरीक्षक काझी, गोकूळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, एकनाथ पाटील, बाळासाहेब पाटील, श्रीपती पाटील, बच्चाराम किल्लेदार, सरपंच ज्योती कांबळे, उपसरपंच शिवाजी पाटील, एल. एस. किल्लेदार, जी. जी. पाटील, जगदीश चौगले, सागर पाटील, अशोक किल्लेदार, पी एम. पाटील, गजानन पाटील, जयवंत घाडगे, एस. बी. पाटील, संदीप तवंदकर, श्रीकांत पाटील, आर. एस. कांबळे, पोपट कांजर, शहाजी किल्लेदार, अशोक पाटील, सदाशिव पोतदार, सुवर्णा गुरव, सुजाता सुतार, सतपाल मगदूम, विलास साठे आदि उपस्थित होते.

▪️जनताच किंगमेकर

तुमच्या सर्वांच्या पाठबळावर आजपर्यंत मी संघर्षातून यश मिळवू शकलो. तुमच्यामुळेच मला राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाली. मी नाही तर तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने किंगमेकर आहात. जसे मला पाठबळ दिले तसेच भक्कम पाठबळ ऋतुराज यांनाही द्या असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes