काव्या - एक जज्बा, एक जुनून’मध्ये काव्याचा विभक्त वाग्दत्त वर म्हणून अभिनेता अनुज सुलेरेचा प्रवेश
schedule10 Sep 23 person by visibility 227 categoryमनोरंजन
मुंबई : सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा व प्रगतीशील मजकूर देण्यात अग्रदूत ठरलेली आहे. 25 सप्टेंबरपासून प्रत्येक सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7:30 वाजता ‘काव्या - एक जज्बा, एक जुनून’ मालिकेचा प्रारंभ होणार आहे. मालिकेत अत्यंत प्रतिभावंत अभिनेत्री सुंबुल तौकीर खान ही काव्याच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या कथानकात देशाची सेवा आणि सर्वसामान्यांची मदत करण्याचा दृढनिश्चय केलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. आयएएस अधिकारी बनण्याच्या ध्येयाने झपाटलेली काव्या ही एक सशक्त महिला व्यक्तीरेखा आहे. ती कठिण निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाही. तेव्हा तिची परीक्षा घेतली जाते तेव्हा ती अपेक्षेपेक्षा अधिकच खरी उतरते.
मालिकेच्या कथानकाला आणखीच खोली देत अनुज सुलेरेचा परिचय करून देण्यात आला आहे. हा वैविध्यपूर्ण अभिनेता ओटीटी शोज आणि चित्रपटांतील अभिनयासाठी वाखाणला गेलेला आहे. तो या मालिकेत काव्याच्या वाग्दत्त वराची अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आपल्या भूमिकेबद्दल चर्चा करताना अनुज सुलेरे म्हणाला की, ‘काव्या: एक जज्बा, एक जुनून’चा एक भाग बनल्याबद्दल मला अत्यंत उत्साहित वाटत आहे. या मदतीस तत्पर आणि मैत्रीपूर्ण कलाकार मंडळींसोबत काम केल्यामुळे माझा हा अनुभव आणखीच मजेशीर झाला आहे. या मालिकेत मी शुभमची भूमिका निभावत आहे. तो आयएएसची तयारी करत असून काव्याचा वाग्दत्त वरही आहे. मात्र त्याचे पात्र हे खूप गुंतागुंतीचे आहे. एक चांगल्या मनाचा माणूस आणि काव्याच्या प्रेमात असूनही त्याचा अहंकार त्याला पराभवाप्रती अतिसंवेदनशील बनवतो. यामुळे तो तिला तिच्या ध्येयाचा त्याग करण्याची मागणी करून टाकतो. मालिकेचे कथानक जसजसे पुढे सरकते तसतसे तो कशा प्रकारे वेगवेगळ्या परिस्थितीतून मार्ग काढतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू पाहायला मिळतील.’
शुभम आणि काव्या यांनी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र जेव्हा त्यांचा सामना अनपेक्षित परिस्थितीशी होतो तेव्हा एकमेकांना विरुद्ध मार्गांवर असल्याचे पाहतात. ही मालिका त्यांच्या नात्यातील गुंतागुंत अतिशय सुरेखपणे दाखवते. त्यांना अनुभवायला आलेल्या विविध भावभावना आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक महत्त्वाकांक्षांचेही दर्शन त्यातून होते.