"चंद्रकांत चषक २०२५" : मैदानावर खंडोबाचा विजयी 'गोल'! संयुक्त जुना बुधवार पेठला उपविजेतेपद : स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule14 Apr 25 person by visibility 386 categoryक्रीडा

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत "चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेततील अंतिम सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवारपेठ फुटबॉल संघाचा ४-० असा पराभव करून "चंद्रकांत चषक -२०२५" वर नाव कोरले. विजेत्या खंडोबा तालीम संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चषक तर उपविजेत्या संयुक्त जुना बुधवार पेठ संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले
"चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरवात आमदार अशोकराव माने, मा. आमदार व शिवसेना उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव, युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, वनश्री सम्राट महाडिक, माजी नगरसेवक ईश्वर परमार पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत, उद्योजक मानसिंगराव खराटे, संजय कदम, महेश पाटील, रणजीत शिंदे, सुशील भांदिगरे, उदय पैठणकर, विजय भोसले, अविनाश पवार यांच्या हस्ते करण्यात आली.
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर , आमदार चंद्रदिप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी मैदानात उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
क्रिकेट वेड्या देशात फुटबॉलवेडे शहर म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत "चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धा बालगोपाल तालीम यांच्या सहकार्याने अतिशय सुंदररित्या नियोजनबद्धपणे ही स्पर्धा संपन्न झाली. याबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे अभिनंदन करून आभार मानले. अशा स्पर्धांमधून आपल्या कोल्हापूरचे अनेक नवीन खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी घडत असतात. कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राचा वारसा जोपासण्यासाठी जाधव परिवार नेहमीच पाठबळ देत राहिल, असे मत मा. आमदार व शिवसेना उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव, युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, मा. आमदार व शिवसेना उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव, युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव, ऋतूराज क्षीरसागर, मानसिंगराव खोराटे, राजन सातपुते, संजय कदम, कमलाकर जगदाळे यांच्या हस्ते झाला.
▪️बक्षीसांचा वर्षाव....
विजेता : खंडोबा तालीम मंडळ - २ लाख ३१ हजार रुपये व मानाचा चंद्रकांत चषक
▪️उपविजेता : संयुक्त जुना बुधवारपेठ संघ - १ लाख ३१ हजार व चंद्रकांत चषक
▪️उपांत्य फेरीतील पराभूत संघ - वेताळमाळ तालीम मंडळ व बालगोपाल तालीम - प्रत्येकी ३१ हजार
▪️मालिकावीर व सामनावीर : अमिन खजीर (खंडोबा तालीम) ३१ हजार व ३१०० रुपये
▪️उत्कृष्ठ फॉरवर्ड : संकेत मेढे (खंडोबा तालीम) - ११ हजार व स्मृतिचिन्ह
▪️उत्कृष्ठ हाफ : हर्ष जरग (जुना बुधवारपेठ) - ११ हजार व स्मृतिचिन्ह
▪️उत्कृष्ठ डिफेन्स : रोमेन सिंग (बालगोपाल तालीम) - ११ हजार व स्मृतिचिन्ह
▪️उत्कृष्ठ गोलरक्षक : देबोजीत घोषाल (खंडोबा तालीम) - ११ हजार व स्मृतिचिन्ह
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बालगोपाल तालमीचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, कार्याध्यक्ष निवास शिंदे, आप्पासाहेब साळोखे, युवराज कुरणे, राहुल चव्हाण, संजय साळोखे, अजित कुलकर्णी, सुरज कुरणे, सुशांत चव्हाण, सागर भांदिगरे, धनंजय घाडगे, अरबाज सय्यद, आशिष पवार, संदीप पवार, रोहन शिंदे, ओंकार जाधव, निरंजन पवार, मयूर पाटील यांच्यासह बालगोपाल तालमीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व खेळाडू यांनी नियोजन केले. फुटबॉल निवेदक म्हणून विजय साळोखे यांनी काम पाहिले.