दुचाकीस ट्रकची धडक; शिक्षक ठार; १ गंभीर
schedule31 Mar 22 person by visibility 25880 categoryगुन्हे
यवतमाळ : चारगाव गावाजवळील वळणावर अचानक बैल आडवा आल्याने दुचाकी चालकाने ब्रेक मारल्याने पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात प्रशांत बुरांडे हे शिक्षक ठार झाले असून श्रीकांत उपाध्ये हे गंभीर जखमी झाले आहेत. आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
वणी येथील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेले प्रशांत बुरांडे श्रीकांत उपाध्ये हे कुरई येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
आज सकाळी शाळेला जात असताना प्रशांत दुचाकीच्या मागे बसले होते. चारगाव गावाजवळील वळणावर अचानक बैल आडवा आल्याने उपाध्ये यांनी ब्रेक मारला. त्यादरम्यान पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये प्रशांत बुरांडे हे जागीच ठार झाले तसेच श्रीकांत उपाध्ये हे जखमी झाले.