राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 या मथळ्याखाली समाज माध्यमांवर फिरत असणारा संदेश फसवणूक करणारा
schedule13 Jan 25 person by visibility 10212 categoryराज्य

कोल्हापूर : राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 या मथळ्याखाली समाज माध्यमांवर फिरत असणारा संदेश फसवणूक करणारा असून यावर कुठल्याही उमेदवारांनी विश्वास ठेवू नये, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर प्रशासनाने कळविले आहे.
उमेदवारांनी अशा प्रकारच्या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवून दिलेल्या लिंकवर माहिती अथवा पैसे जमा करू नयेत.
सद्या अशा कोणत्याही पद भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.