राजकारणातील हुकूमशाहीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर 'उत्तर' च्या रिंगणात : हाजी अस्लम सय्यद
schedule22 Mar 22 person by visibility 8270 categoryराजकीय
कोल्हापूर : राजकारणात मी म्हणेल तीच पूर्व दिशा अशी भूमिका घेणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची घोषणा हाजी अस्लम सय्यद यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली.
२०१९ साली हातकणंगले लोकसभा मतदार संघात निवडणूक लढलेले हाजी असलम सय्यद यांनी गत निवडणुकीत तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढताना दीड लाखाच्या आसपास मते घेतली होती. बहुजन वंचित आघाडी कडून लढलेल्या अस्लम सय्यद यांच्यामुळे राजू शेट्टी यांना पराभव पत्कारावा लागला होता. शिवाय तो मतदारसंघ सय्यद यांच्यासाठी नवीनच होता. तो लोकसभा मतदारसंघ असल्याने आकाराने मोठा होता. ७२२ गावांपैकी फक्त शंभर गावापर्यंत प्रचार मोहीम राबवण्यात आली होती. तरी ही लक्षणीय मते मिळाली होती. कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ आकाराने छोटा आहे शिवाय या मतदारसंघात मोठा जनसंपर्क असल्याने हुकुमशाहीला कंटाळलेले मतदार आपल्याला संधी देतील असा दावा हाजी अस्लम सय्यद यांनी केला.
* उमेदवारी अर्ज २४ मार्च रोजी दाखल करणार
हाजी अस्लम सय्यद यांचे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये उतरण्याचे निश्चित झाले असले तरी ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार याची घोषणा ते उद्या करणार आहेत. सय्यद निवडणूक उमेदवारी अर्ज २४ मार्च रोजी दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.