डीकेटीईच्या २९ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या नामांकित कंपनीत निवड
schedule15 Jul 25 person by visibility 211 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या तब्बल २९ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड करण्यात आलेली आहे. या कॅम्पस इंटरव्हयूकरीता एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. ऍप्टीटयुट, टेक्निकल आणि एच.आर. राउंड या सर्व फे-यांमध्ये डीकेटीईच्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आपली गुणवत्ता सिद्ध केली.
हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज ही एक आंतरराष्ट्रीय आय.टी. कंपनी असून ती डिजीटल सोल्यूएशन्स, सॉफटवेअर डेव्हलपमेंट, आणि क्लाउड सेवा पुरवते. १९९० साली स्थापन झालेली ही कंपनी विविध देशांमध्ये कार्यरत असून बँकिंग, दूरसंचार, ऑटोमोबाईल आणि हेल्थकेअर क्षेत्रात सेवा देते.
कंपन्याना लागणारे उत्तम तंत्रज्ञ तयार करता यावेत यासाठी विद्यार्थ्यांना डीकेटीईमध्ये खास सॉफट स्कीलचे वेगळे तास आयोजित करुन त्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. डीकेटीईमध्ये इंटरव्हयूच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये खास प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. डीकेटीई संस्थेने आपल्या उत्तम शैक्षणिक दर्जाच्या बळावर विद्यार्थ्यांना क्वालीटी प्लेसमेंट गेली कित्येक वर्षे सातत्याने उपलब्ध करुन देत आहे. सध्या इंजिनिअरींग क्षेत्रात जोरदार स्पर्धा असल्याकारणाने हे यश मोठे मानले जाते आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नांवे - सानिका खाणे, सेजल मोरे, श्रध्दा पाटील, सत्यम पोळ, नेत्राली पाटील, सानिया पाटील, स्वालेहा मेस्त्रि, ईश्वरी सारडा, नेहा माळी, अनिरुध्द मुदले, पूर्वा पाटील, हर्षवर्धन मगदूम, तेजस सोनवणे, अपर्णा थोरवत, सुहास कुदळे, सुमंत लोखंडे, मासिरा पटवेगार, गायत्री धोत्रे, अमेया तोडकर, अब्दुलहमीद पटेल, आर्यन निंबाळकर, सुमित पडळकर, लबुना शेख, आयुषी नानवणी, शुभम निकम, राज कागवाडे, अनिकेत चिकोडी, अदित्य बिडवे व अथर्व पाटील.
विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना संस्थेच्या डायरेक्टर प्रा.डॉ.सौ.एल.एस.अडमुठे, डे.डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील,विभागप्रमुख डॉ.डी.व्ही.कोदवडे,डॉ.एस.के.शिरगांवे,डॉ.टी.आय.बागबान व टीपीओ प्रा.जी.एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.