SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारतीय लोकशाहीचा पोलादी आराखडा: राष्ट्रीय नागरी सेवा दिनकोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेकोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’; ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरणदीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्र

जाहिरात

 

कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह ४ बसस्थानकांचे होणार उद्घाटन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कोल्हापूर दौरा

schedule15 Apr 26 person by visibility 245 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते शासन निधीतून बांधण्यात आलेल्या कोल्हापूर शहरातील एसटीच्या नूतन छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह चार बसस्थानकांचे उद्घाटन होणार आहे.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर बसस्थानकाचे उद्घाटन दुपारी ४.०० वाजता, वाठार बसस्थानकाचे उद्घाटन दुपारी १.२० वाजता, पेठवडगाव बसस्थानकाचे उद्घाटन दुपारी १२.४० वाजता, तर जयसिंगपूर बसस्थानकाचे उद्घाटन दुपारी २.२० वाजता होणार आहे.

या दौऱ्यात मंत्री सरनाईक कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी करणार असून सकाळी ११.३० वाजता श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर येथे दर्शन घेणार आहेत. तसेच दुपारी २.३० वाजता नृसिंहवाडी येथे श्री दत्त महाराजांचे दर्शन घेणार आहेत.

या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाला आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून विविध ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहेत.

🟠 संभाजीनगर बस स्थानकासाठी 9.80 कोटी, पेठवडगाव बस स्थानक 1 कोटी, वाठार बसस्थानक 1 कोटी, जयसिंगपूर 2 कोटी निधी तत्कालीन पालकमंत्री तथा परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी 2021, 2022 मध्ये मंजूर केला होता

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes