SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
व्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंदठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधीकोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणीपदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणगोकुळ निवडणुकीत मंत्र्यांच्या मुलाविरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र मैदानात; शशिकांत खोतांचा जोरदार हुंकार!शिक्षकांच्या अन्यायाविरोधात रोष! पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’चा बहिष्कारथकबाकीदारांना नोटिसा बजावून वसुली करा, अन्यथा मिळकतींवर बोजा नोंदवा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडरग्गेडियनच्या ‘रंगताली’ दांडिया-गरबा नाईटला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसादमहायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचा विश्वास

जाहिरात

 

ग्रामीण भागातील 42 अनधिकृत व थकबाकीपोटी 3 नळ कनेक्शन खंडीत

schedule19 Mar 25 person by visibility 650 categoryमहानगरपालिका

कोल्हापुर :महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने आज शहरालगतच्या ग्रामीण भागातील 42 अनधिकृत व थकबाकीपोटी 3 नळ कनेक्शन खंडीत  करण्यात आली. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार व अनधिकृत कनेक्शन धारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची मोहीम पाणीपुरवठा विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे.

  यामध्ये आज पाणी पुरवठा विभागाकडील वसुली पथकामार्फत सदाशिव शांता पार्क, शाकंभरी कॉलनी, शिंगणापूर, आर.के.नगर, भारती विद्यापीठ समोरील निगडे मळा, समृधी कॉलनी या शहरालगतच्या ग्रामीण भागातील मिळकत धारकांनी महापालिकेच्या पाण्याच्या लाईन वरून 42 अनधिकृत कनेक्शन जोडून घेतली होती. ही सर्व कनेक्शन आज खंडित करण्यात आली आहे. तसेच पाणी बिल थकीत असलेली 3 मिळकतींचेही नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले.

 सदरची कारवाई प्रशासक के.मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हि कारवाई शाखा अभियंता मयुरी पटवेगार, संजय पाटील, अजीत मोहिते, नरेद्र प्रभावळकर, मधु कदम, अमर बागल यांनी केली.

 ही मोहीम येथुन पुढेही सुरु राहणार असून शहरातील नागरिकांनी आपली अनाधिकृत नळ कनेक्शन रितसर अर्ज करुन व योग्य ते शुल्क भरुन नियमित करुन घ्यावी तसेच पाणी बिलाची रक्कम वेळेवर भरणा करावी व नळ कनेक्शन बंद करणे, वर्तमानपत्रात नाव प्रसिध्द करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटु प्रसंग टाळावेत असे आवाहन महापालिकेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes