चेसिस नंबर, रजिस्ट्रेशन नंबर मध्ये फेरफार करून वाहने वापरणारी तसेच विकणारी टोळी जेरबंद; तीस लाख किंमतीचे 6 टेंम्पो ट्रॅव्हलर गाड्या जप्त
schedule05 Jun 24 person by visibility 1036 categoryगुन्हे

कोल्हापूर : चेसिस नंबर व रजिस्ट्रेशन नंबर मध्ये फेरफार करून वाहने वापरणारी तसेच विकणारी टोळी जेरबंद व 30,00,000/- (तीस लाख) रूपये किंमतीच्या 06 टेंम्पो ट्रॅव्हलर गाड्या जप्त करण्यात आल्या ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई शाखेने केली.
चोरीस गेलेल्या वाहनांचा व चोरट्यांचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार विनायक चौगुले यांना माहिती मिळाली की, पंकज मोरे, रा. पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर याच्याकडे दोन टॅम्पो ट्रॅव्हलर गाड्या असून सदर दोन्ही गाड्यांचे रजिस्ट्रेशन व चेसिस नंबरमध्ये फेरफार केला आहे. अशा मिळाले माहितीचे अनुषंगाने स्था. गु.अ. शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अमंलदार विनायक चौगुले, बालाजी पाटील, अमर आडुळकर, अशोक पवार, ओंकार परब, आयुब गडकरी यांचे पथकाने दि.05.06.2024 रोजी पोर्ले, ता. पन्हाळा येथे जावून पंकज तानाजी मोरे, व.व.25, रा. पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर याचेकडील टेम्पो ट्रॅव्हलर गाड्या नंबर MH-20-AS-5186 व MH-04-FK- 1251 या गाड्यांची व त्याचेकडील कागदपत्रांची खात्री केली असता सदर गाड्यांचे रजिस्ट्रेशन नंबर व चेसिस नंबरमध्ये तफावत आढळून आली. त्याबाबत त्याचेकडे तपास केला असता त्याने सदर गाड्या या परमीटच्या होत्या व परमीट गडद्यांचे टॅक्सची रक्कम जास्त असते म्हणून बंद स्थितीत असणारे गाड्यांचे मालकाकडून त्यांचे गाडयांचे पेपर विकत घेवून ते त्याचेकडील चालू स्थितीत असणारे गाड्धांचे नंबरवर टाकून विकत घेतलेली कागदपत्र दाखवून वाहन चालवित आहे असे निदर्शनास आले.
याबाबत त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले, व.व.37. रा. प्लॉट नं. 18-बी, भारतीनगर, मोरेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर हा प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर येथे एजंट यांचे मार्फतीने बंद वाहनांची कागदपत्र संबंधीत मालकाकडून कमी किमतीत विकत घेवून गरजू लोकांना ती कागदपत्रे देवून त्या कागदपत्राचे आधारे त्याचे ओळखीचे करीम गफूर शेख, व.व.52, रा. मौलाना आझादनगर, गोकुळ शिरगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर व इम्रान मिस्त्री, रा. इचलकरंजी यांचेकडून त्याचे पांजरपोळ, यादवनगर, कोल्हापूर येथील गॅरेजमध्ये गाड्यांचे चेसिसीस नंबरमध्ये फेरफार करीत होते अशी माहिती पुढे आली. सदर माहितीव्दारे अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले व करीम गफूर शेख यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी आणखी चार टेम्पो ट्रॅव्हलर गाडयांचे नंबरमध्ये फेरफार केलेची कबुली दिली. अशा एकूण सहा टॅम्पो ट्रॅव्हलर वाहनांचे नंबरमध्ये फेरफार केलेचे निषन्न झाले.
फेरफार केलेल्या 30,00,000/- रुपये किंमतीच्या एकूण सहा टॅम्पो ट्रॅव्हलर ताब्यात घेतल्या असून त्यांचे नंबर 01) MH-20-AS-5186, 02)MH-04-FK-1251, 03)MH-09-AQ-6261, 04)MH-12-KQ-2469, 05) MH-04-G-7472 व 06) MH-04-G-8439 असे आहेत. सदरबाबत शासनाचा टॅक्स चुकविणेकरीता गाहघांचे रजिस्ट्रेशन नंबर व चेसिस नंबरमध्ये फेरफार करून फसवणूक केले बाबत राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून आरोपी नामे 01) अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले, व.व.37. रा. प्लॉट नं. 18-बी, भारतीनगर, मोरेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर, 02) करीम गफूर शेख, व.व.52, रा. मौलाना आझाद नगर, गोकूळ शिरगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर, 03) पंकज तानाजी मोरे, व.व.30, रा. पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, 04) रूपेशविलास पवार, व.व.34, रा.1382, बाईच्या पुतळ्याजवळ, राजारामपुरी, कोल्हापूर, 05) विशाल परशराम चव्हाण, व.व. 22, रा. अस्मिता नगर, अब्दुललाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर व 06) संभाजी आनंदा धनगर, व.व.33, रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेवून राजारामपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाणे कडून सुरु आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार विनायक चौगुले, बालाजी पाटील, अमर आडुळकर, अशोक पवार, राजेश राठोड, ओंकार परब, आयुब गडकरी, संजय पडवळ व संतोष पाटील यांनी केली आहे.