SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​३ लाख मतदार प्रक्रियेतून वंचित राहण्याची भीती; सतेज पाटलांचा प्रशासनावर हल्लाबोल!केडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानीमाणिक पाटलांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मुंबईत लवकरच बैठक होणार!सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या प्रारंभ खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावापेपरफुटी'चे महाराष्ट्र मॉडेल: लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लिलाव, TET परीक्षा रद्द!शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे उद्या रविवारी वितरण

जाहिरात

 

शुक्रवारी रात्री पाहायला मिळणार उल्कावर्षाचा सुंदर नजारा

schedule11 Dec 24 person by visibility 852 categoryराज्य

कोल्हापूर  : या वर्षातील सर्वात मोठ्या उल्कावर्षांपैकी एक असलेल्या जेमिनिड्स उल्कावर्षाव  येत्या शुक्रवार (१३ डिसेंबर) रात्री मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. या वर्षी चंद्रप्रकाशामुळे उल्कावर्षाव दिसण्यात थोडासा प्रभाव पडत असला तरीही प्रति तास सुमारे 120 उल्का दिसण्याची शक्यता आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अंतराळ संशोधन केंद्राने या खगोलीय नजाराचे खुले निरीक्षण सर्व नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासाठी रात्री ८ नंतर आयोजित केले आहे.

 पन्हाळा हे निरीक्षणासाठी आदर्श ठिकाण आहे कारण  येथे प्रकाश प्रदूषण कमी आहे आणि आकाश स्पष्ट दिसते. तरी सर्व नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी घ्यावा असे आवाहन या केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे.

▪️उल्कावर्षाचे निरीक्षण कसे करावे?
 शहराच्या प्रकाशापासून दूर, अंधारात जा.
आरामदायक आसन घ्या आणि डोळ्यांना अंधारात सवय होऊ द्या.
डोळे आकाशाकडे  करा.
उल्का दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes