कर्तुत्वसंपन्न स्त्री ही कुटुंबाचा, समाजाचा आधारस्तंभ : मधुरिमाराजे छत्रपती
schedule16 Mar 25 person by visibility 386 categoryसामाजिक

कोल्हापूर : कर्तुत्व संपन्न स्त्री ही आपल्या कुटुंबाला तसेच समाजाला घडवत असते, स्त्रियांनी खूप शिकले पाहिजे, आर्थिक संपन्न झाले पाहिजे, आपल्या मुलाबाळांच्या वर चांगले संस्कार केले पाहिजेत तरच कर्तुत्वसंपन्न समाज निर्माण होतो. असे भावपूर्ण उदगार मधुरीमाराजे छत्रपती यांनी काढले.
महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळ मुंबई आयोजित तसेच श्री देवांग समाज चौंडेश्वरी मंदिर कोल्हापूर व श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांच्या सहकार्याने कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय महिला व समाज बांधवांच्या मेळाव्यात कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डेप्युटी कमिशनर जी.एस.टी पुणे येथील श्रीमती मनीषा तारळेकर होत्या. त्यांनी याप्रसंगी स्त्रियांनी खूप शिकावे विशेषतः स्पर्धा परीक्षा द्याव्यात म्हणजे स्वावलंबी होता येईल असे आवाहन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर स्वागत व परिचय राजेंद्र ढवळे यांनी केले. महिला मेळाव्याचा उद्देश व प्रास्ताविक महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळ महिला अध्यक्ष सुषमा दौंडे यांनी केले. तर मेळाव्याचा व महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाच्या कार्याचा वाढावा अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी आपल्या भाषणात घेतला.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सुवर्णा गुंडगे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच कोल्हापूर कोष्टी समाज महिला मंडळ यांचा आदर्श संस्था म्हणून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास महिला कार्याध्यक्ष विजयमाला वाघ, ट्रस्टी अरविंद तापोळे, अंकुशराव उकार्डे देवांग कोष्टी समाज कोल्हापूरचे माजी अध्यक्ष बळीराम कवडे, मल्हारराव ढोले, किरण तारळेकर, विठ्ठलराव डाके महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग समिती सदस्य श्री मनोजराव दिवटे, देवांग समाज अध्यक्ष इचलकरंजीचे, विश्वनाथ मुसळे, संजय कांबळे, राजश्री ढवळे, मेघमाला पांडकर , राजश्री धुमाळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते आभार महासचिव ही रामचंद्र निमणकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता ढवळे , स्मिता बुगड, संगीता धोत्रे इ. केले. कार्यक्रमास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोष्टी समाजातील महिला तसेच विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.