+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule21 Mar 24 person by visibility 276 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महानगरपालिके आरोग्य विभागामार्फत शहरात मान्सुपुर्व नालेसफाईचे काम सुरु केले आहे. मुख्य 13 नाल्यांची सफाई महानगरपालिकेच्या 2 पोकलॅण्ड मशीनद्वारे व 2 जे.सी.बी मशीनद्वारे 206 नाल्यांची सफाई व 40 कर्मचारी यांचे मार्फत 476 छोटया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. 2 पोकलॅण्ड मशीनव्दारे गाडीअड्डा व हुतात्मा पार्क येथून मुख्य नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. या पोकलॅण्ड मशीनद्वारे आजअखेर 50 डंपर गाळ नाल्यातून काढण्यात आला आहे. 

तर 2 जे.सी.बी मशीनव्दारे मलईगीरी अपार्टमेंट, कदमवाडी रोड, विक्रमनगर, धान्य गोडावुन या परिसरात नाले सफाईचे काम सुरु करण्यात येत आहे. मनुष्यबळाव्दारे आतापर्यंत शहरातील भोसलेवाडी, कदमवाडी, महाडीक वसाहत, रुईकर कॉलनी, साळोंखेनगर, शायकीय मध्यवर्ती कारागृह परिसर, रायगड कॉलनी- जरगनगर, सुर्वेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जिवबानाना जाधव पार्क अशा 10 प्रभागांची छोटया नाल्यांची स्वच्छता करण्यात आलेली आहे. 

आजअखेर मनुष्यबळाव्दारे 476 नाल्यापैकी आजअखेर 69 नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. उर्वरीत सर्व नालेसफाईचे कामकाज दि.15 मे 2024 पर्यंत पुर्ण करण्यात येणार असल्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.