अन्... आजोबांचा पुनर्जन्म झाला; कोल्हापुरातील लक्षवेधी घटना
schedule02 Jan 25 person by visibility 471 categoryसामाजिक
कोल्हापूर : कसबा बावडा येथील पांडुरंग रामा उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला त्यांना तात्काळ नातेवाईकांनी दवाखान्यात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच त्यांनी उपचारास प्रतिसाद न दिल्याने पांडुरंग यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
त्यामुळे घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली, पांडुरंग यांचा मृतदेह घरी घेवून जात असतानाच रस्त्यात अॅम्बुलन्स स्पीड बेकरमुळे आदळली. या धक्क्याने पांडुरंग यांची काहीशी हालचाल सुरू झाली. ही गोष्ट लक्षात येताच त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले.
तब्बल दोन आठवड्याच्या उपचारानंतर त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. अन ते घरी परतले. कसबा बाबड्यातील पांडूरंग तात्या शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांना एक मुलगी आहे. १९८० सालापासून ते वारकरी संप्रदायात आहेत. सध्या तात्यांना भेटावयास त्यांच्या घरी पै पाहुणे गर्दी करू लागले आहेत. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर घरी घेऊन जाताना त्यांना पुनर्जन्म मिळाला किंवा काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी चर्चा सध्या परिसरात होत आहे.