SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यात 15 ऑक्टोबर पासून वादळी पावसाचा अंदाजयोजनांचा लाभ न देणाऱ्या हॉस्पिटलची तक्रार द्या, कारवाई करतो : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरडॉ. आंबेडकरांच्या पुतळा आगमन सोहळ्याबद्दल बौध्द समाजातर्फे आमदार यड्रावकरांचा सत्कारसतरा आक्टोबरला “एक सांज पन्हाळगडावर” भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन यांच्यातर्फे पाडळी खुर्द येथील विद्या मंदिरमध्ये आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळाऊर्जा, इच्छाशक्ती आणि जोखीम घेण्याची तयारीच आपल्याला जीवनात यशस्वी करते : संकर्षण कऱ्हाडेरंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच : आमदार राजेश क्षीरसागरडॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम; राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षणकोल्हापूरात २८ ऑक्टोबरला जिल्हास्तर युवा महोत्सव; युवक-युवतींना सहभागाचे आवाहन८.१२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

जाहिरात

 

‘गोकुळ कडून म्हैस दुध खरेदी दरात १ रुपये ५० पैसे वाढ’; गाय दूध खरेदी दरात २ रूपये कपात : चेअरमन अरुण डोंगळे

schedule30 Sep 23 person by visibility 6266 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. तरी दि.०१ ऑक्टोंबर पासून म्हैस दूध ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रुपये १ ने दूध खरेदी दरात वाढ केली आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे.

 दि.३० सप्टेंबर रोजीच्‍या संचालक मंडळाच्‍या मिटिंगमध्‍ये निर्णय घेण्‍यात आला आहे. अशी माहिती संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली .

 दिनांक ०१ ऑक्टोंबर रोजी पासून दुध पुरवठा करणाऱ्या जिल्ह्या व जिल्ह्याबाहेरील दुध उत्पादकांच्या गाय दुध खरेदी दरामध्ये २ रुपये कपात करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र मध्ये खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत. बाजारपेठेतील  दुध पावडर, बटर, लोणी यांचे दर कमी झाले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून गाय दूध खरेदी दर कमी करणेत येत आहे.

 म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ४९.५० वरून रूपये ५०.५० करण्यात आला आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये ५१.३० वरून रूपये ५२.८० करण्यात आला आहे.

गाय दुधामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३५.०० रूपये वरून ३३.०० रूपये करण्यात आला आहे.

   तसेच दि.०१ ऑक्टोंबर रोजी पासून सुधारित दरपत्रक लागू होईल. संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना सुधारित दरपत्रक पाठवणेत येणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes