SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

schedule15 Nov 25 person by visibility 445 categoryशैक्षणिक

अतिग्रे :  येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल डे बोर्डिंग स्कूल विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक  आण्णासाहेब जाधव  उपस्थित होते.  मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, "खेळाडूंनी खेळामधून तात्पुरता आनंद घेण्यापेक्षा त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे. विविध खेळातील कौशल्ये आत्मसात करावीत. खेळ जीवनात शिस्त, अनुशासन शिकवत असतो. खेळातूनच देशाचे आदर्श नागरिक घडत असतात."

 कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना शाळेच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांनी  खेळाकडे करिअर म्हणून पहावे असा संदेश आपल्या मनोगतातून दिला. सर्व विद्यार्थ्यांनी हाऊसनुसार प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. त्यानंतर क्रीडाज्योतीचे पूजन करण्यात आले.  मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली.  अग्नी हाऊस, त्रिशूल हाऊस, आकाश हाऊस व पृथ्वी हाऊस या गटांतर्गत विविध स्पर्धा पार पडल्या. 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी रनिंग,थाळी फेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, रिले, कुस्ती, टेनिस, स्विमिंग, आर्चरी, शुटिंग या वैयक्तिक खेळांसोबतच बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, योगा स्पर्धा, बुद्धिबळ, ज्युडो, कराटे, तायक्वांदो यासारख्या सांघिक खेळांच्या स्पर्धाही पार पडल्या. 
  यावेळी पालकांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 50 मी रनिंग, रस्सीखेच, कोन रेस यासारख्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 
 या कार्यक्रमासाठी  अध्यक्ष म्हणून संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती उपस्थित होत्या. बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉ. एच एम नवीन,  डे बोर्डिंग स्कुलचे प्राचार्य अस्कर अली, ज्युनि कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल चेअरमन  संजय घोडावत व विश्वस्त  विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes