+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustकाळम्मावाडी योजनेद्वारे आज शनिवारी दुपारपर्यंत कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु adjustकोल्हापूर जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून 7 हजार 212 क्युसेक विसर्ग; राधानगरी धरणाचे स्वयंचलित 5 दरवाजे खुले adjustअतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 48 प्रमुख जिल्हा मार्ग बंद adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना adjustबेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबई मनपा आयुक्तांना सूचना adjustबापट कॅम्पमधील मूर्तिकारांना मार्केट यार्डात निवारा शेड उपलब्ध करा : सतेज पाटील यांच्या सूचना; पूरग्रस्त भागाची केली पाहणी adjustकाँग्रेसच्या समन्वय समितीत आमदार सतेज पाटील adjustबनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस adjustराज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा adjust'‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1000867055
1000866789
schedule17 Apr 24 person by visibility 320 categoryराज्य
▪️जिल्हयातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुढील 15 दिवस नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदान दि.7 मे रोजी होणार असून मतदार यादीत नाव असणाऱ्या मात्र कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या मतदारांनी आपल्या स्वगावी येवून मतदानाचा हक्क बजावावा. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टया सुरू असून सुट्टीबरोबर लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांनी आवाहन केले आहे. कोल्हापूर जिल्हयाच्या मतदान टक्केवारीत यावर्षी सर्व मतदार मतदान करून लक्षणीय वाढ नोंदवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील तयारीबाबत नोडल अधिकारी यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस., हातकणंगले निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, अपर जिल्हाधिकारी श्रीम. किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

  यावेळी मतदार जनजागृतीबाबत स्वीप समितीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी याबाबत कामकाज पाहणारे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस. यांनी पुढिल 15 दिवसांचे नियोजन सांगितले. यामधे मतदार पालकांना विद्यार्थ्यांकडून देण्यात येणारे पत्र, मतदार जनजागृती रॅली, कमी मतदान टक्केवारी असलेल्या गावांमधील विशेष कार्यक्रम, जिल्हास्तरावरील मतदार आयकॉन मार्फत करावयाची जनजागृती, प्रमुख शहरांमधील विविध कार्यक्रमांसह विविध माध्यमांमधून करावयाचे उपक्रम याबाबत नियोजन करण्यात आले. या कामांसह प्रशिक्षणादरम्यान आता कर्मचाऱ्यांना ई-प्रशिक्षण साहित्य निर्माण करून देण्याच्या सूचनाही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.येडगे यांनी दिल्या. इव्हीएम बाबत सुरक्षा व्यवस्था चांगल्या प्रकारे करावी. मत मोजणीच्या ठिकाणी सर्व स्वच्छता करून आवश्यक नामफलक लावावेत याबाबतच्याही सूचना संबंधितांना यावेळी त्यांनी दिल्या.

 याबरोबर मतदान केंद्र निहाय आवश्यक किमान सोयीसुविधा तसेच ईव्हीएमबाबत सुरक्षा, निवडणूक साहित्य आदी बाबत नोडल अधिकारी यांनी माहिती दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांचे दुसरे रॅण्डमायझेशन 20 एप्रिलला तर दुसरे प्रशिक्षण 26-27 एप्रिलला होणार आहे. यावेळीच्या मतदानाअगोदर सर्व मतदारांना निवडणूक विभागाकडून मतदान स्लीप वाटप करण्यात येणार आहेत. दिव्यांग व 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना घरपोच मतदान सुविधा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे अतिरीक्त मनुष्यबळ नेमण्यात येणार आहे. या अनुषंगिक आवश्यक साहित्य व दळणवळणाच्या सुविधा वेळेत देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सध्या उन्हाळा तीव्र होत असून दुपारचे तापमान वाढत आहे. याचा परिणाम मतदान केंद्र ठिकाणी आलेल्या मतदारांवर व सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर होवू नये म्हणून सर्व प्रशिक्षण ठिकाणी निवारा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. क्षेत्रियस्तरावर काम करणाऱ्या व वेगवेगळ्या फिरत्या पथकांसाठी आवश्यकता पडल्यास रूग्णवाहिका व स्थानिक रूग्णालयात आवश्यक सुविधा असल्याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिले.