SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणकळंबा ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर प्रकाश खडके यांच्या हस्ते ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेत ध्वजारोहण उत्साहात कामगार दिन : श्रमिकांच्या घामाचा आणि संघर्षाचा सन्मानमहाराष्ट्र दिन : मराठी अस्मितेचा सुवर्ण सोहळास्वच्छता मोहिमेत 25 टण प्लास्टिक, तणकट व खरमाती उठावटाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून पाहणीराष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवडडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशनगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा; अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण; श्री. महादेव दूध संस्थेची याचिका फेटाळली

जाहिरात

 

अंबाबाई मंदिर परिसर विकास: २ मे पासून मालमत्तांचे प्राथमिक सर्वेक्षण; प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आवाहन

schedule29 Apr 26 person by visibility 352 categoryराज्य

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने ६ मे २०२५ रोजी या विकास आराखड्यास मंजुरी दिली असून, या प्रकल्पामुळे कोल्हापूरच्या या प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिराला त्याचे मूळ वैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. या आराखड्याचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून मंदिर परिसरातील मालमत्तांचे प्राथमिक सर्वेक्षण येत्या २ मे २०२६ पासून सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या सर्वेक्षणासाठी विशेष तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये महसूल विभाग, महानगरपालिका आणि नगर भूमापन विभागातील तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उतरून प्रत्येक मिळकतधारकाची भेट घेणार आहेत आणि विहित नमुन्यातील सर्वेक्षण फॉर्म भरून घेणार आहेत. या प्रक्रियेत संकलित होणारी माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, त्यावरच परिसर विकासाची पुढील दिशा आणि कार्यवाही अवलंबून असणार आहे.


या पार्श्वभूमीवर, मंदिर परिसरातील सर्व मिळकतधारकांनी आपल्या मालमत्तेबाबतची अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती पथकाला देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे. या विकास प्रकल्पामुळे शहराच्या ऐतिहासिक सौंदर्यात भर पडणार असून, भाविकांसाठी अधिक सुसज्ज सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने हे सर्वेक्षण अत्यंत कळीचे ठरणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes