अटल चषक २०२५ : तटाकडील तालीम मंडळ आयोजित सिनियर फुटबॉल स्पर्धा १६ एप्रिपासून
schedule15 Apr 25 person by visibility 254 categoryक्रीडा

कोल्हापूर : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक सिनियर फुटबॉल स्पर्धा २०२५ यावर्षी १६ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेतील विजेत्या संघास पहिले बक्षीस १ लाख तर दुसरे बक्षीस ७५ हजार व आकर्षक अटल चषक दौउन गौरवण्यात येणार आहे. १६ तारीख दुपारी ४ वाजता दिलबहार विरुद्ध प्रॅक्टीस क्लब या सामन्याने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल
संपूर्ण स्पर्धा KSA च्या नियमानुसार होणार स्पर्धेमध्ये बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट हाफ, बेस्ट गोल कीपर, बेस्ट डिफेन्स अशी बक्षिसे असणार आहेत.. स्पर्धे दरम्यान भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती असणार आहे.