SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे ?कोल्हापूर ते वैभववाडी नवा मार्ग आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अशा दोन्ही कामांना वेग देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीकेआयटी मध्ये ‘ स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२५’ चे आयोजन अंतिम फेरीसाठी देशभरातील २८ संघ सहभागी होणारउत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकरज्याचा वर्तमानकाळ आखीव असतो,त्याचा भविष्यकाळ प्रयत्नांच्या जोरावर रेखीव व प्रभावी होतो : माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंतडॉ. हर्षवर्धन पंडित यांना आंत्रप्रेन्योरशीप एक्सलन्स पुरस्कारकृषी उत्पन्न बाजार समिती सेस विरोधात व्यापाऱ्यांचा बंद यशस्वीनोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर : नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडेडीकेटीईचे प्रा. प्रविण जाधव यांना पी.एच.डी. प्रदानगार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ५५वे पुष्प प्रदर्शन

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न, ...पण वेबसाईट सुरक्षित

schedule23 Jan 25 person by visibility 461 categoryराज्य

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा आज झालेला प्रयत्न फायरवॉलमुळे असफल ठरला आहे. विद्यापीठाची वेबसाईट सुरक्षित आहे, असे संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर यांनी कळविले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, गुगल सर्च इंजिनद्वारे शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट शोधणाऱ्या व्यक्तींना ‘ही साईट हॅक झाली असण्याची शक्यता आहे,’ अशा स्वरुपाचा संदेश आज दुपारपासून दिसत होता. बिंग, डकडकगो आदी अन्य सर्च इंजिनवर असा संदेश दिसत नव्हता. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून संगणक केंद्रामार्फत फायरवॉल सुरक्षेची तपासणी केली असता काही पृष्ठे हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. सदर पृष्ठांबाबत खबरदारी घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुगल सर्च इंजिनला सदर बाब कळविण्यात आली आहे.

अशा प्रकारे हॅकिंग करण्याचे प्रयत्न जगभरातील हॅकर्सकडून सातत्याने होत असतात. त्यांचे विद्यापीठ संगणक केंद्राकडून सतत मॉनिटरिंग होत असते आणि फायरवॉलद्वारे ते हल्ले परतवूनही लावले जात असतात. त्यातूनही एखादे पृष्ठ प्रभावित झाल्यास अशा प्रकारचा संदेश दिसण्याची शक्यता असते, असेही  रेडेकर यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes