SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावायश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात अभिवादनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारकेंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहितीजप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलावशक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरुडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना; मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करारसकारात्मक सुरुवात, सातत्य, संयम ठेवा स्वप्न साध्य होईल : ईशा झंवर; केआयटी प्रचंड उत्साहामध्ये ई-समीट संपन्न

जाहिरात

 

आमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव; ६ लाखाहून अधिक वह्यांचे संकलन

schedule12 Apr 25 person by visibility 583 categoryसामाजिक

▪️यशवंत निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी गर्दीचा महापूर, विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रम साजरे

कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस शनिवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून विधायक उपक्रम धडाक्यात राबवून सामाजिक बांधिलकीची वीण घट्ट करण्यात आली.  यावेळी शुभेच्छा म्हणून ६ लाखांहून अधिक वह्या संकलित झाल्या. 

हनुमानजयंती दिवशीच सतेज पाटील यांचा वाढदिवस असल्याने त्यांचे होमटाऊन कसबा बावडा 'सतेजमय' झाले होते. कोल्हापूर शहरासह दक्षिण, राधानगरी, करवीर, चंदगड, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा, भुदरगड, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज परिसरात समाजपयोगी उपक्रम व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. 

  आमदार सतेज पाटील यांनी सकाळी ग्रामदैवत हनुमान आणि दख्खनचा राजा जोतिबाचे  दर्शन घेतले. सकाळी आई  शांतादेवी डी. पाटील,  वैजयंती संजय पाटील,  राजश्री काकडे,  पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचे औक्षण करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील यांच्या उपस्थितीत केक कापून आमदार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

‘यशवंत निवास' समोर उभारलेल्या भव्य मंडपामध्ये दुपारी ४ वाजल्यापासून  शुभेच्छा देण्यासाठी  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून राजकीय, सहकार, शैक्षणिक, कृषी, कला, क्रीडा, आरोग्य सामाजिकसह विविध क्षेत्रातील राज्यभरातील मान्यवर कार्यकर्ते मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले,  बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, खा. उदयनराजे भोसले, माजी खा संभाजीराजे छत्रपति, आ नितीन राऊत, खास. धैर्यशील माने, आमदार अतुल भोसले, काँग्रेसचे नेते अनिस अहमद, सुनील केदार, यशोमती ठाकूर , विशाल मुत्तेमवार, खासदार मुकुल वासनिक, विशाल प्रकाशबापू पाटील, अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, अरुण लाड, इम्रान प्रतापगडी, वर्षा गायकवाड, ज्योती गायकवाड, मोहन जोशी, सचिन सावंत, कुणाल पाटील, विक्रम सावंत,असलम शेख, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, मोहन जोशी, गुजरातचे विरोधी पक्ष नेते परेश धनानी, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम बी पाटील, कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव, खा ओमराजे निंबाळकर, वैभव नायकवडी, रजनीताई मगदूम पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, योगेश जाधव, संजयबाबा घाटगे, भानुदास माळी, यांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या.

खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राजूबाबा आवळे, सत्यजित पाटील सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, के पी पाटील, कर्नाटकचे आमदार लक्ष्मण सवदी, सांगलीचे पृथ्वीराज पाटील, जि. प. माजी अध्यक्ष राहूल पी पाटील, राजेश पी पाटील, जिल्हा बँक संचालक भैया माने, युवराज पाटील (बापू )  
हातकणंगले सभापती महेश पाटील,  शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे,सुनील मोदी, सुनील शिंत्रे,  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, बाळ पाटणकर, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे आणि सर्व संचालक, क्रीडाईचे के पी.खोत आणि संचालक, राहुल देसाई, राहुल खंजीरे, राजू लाटकर, महादेवराव अडगुळे, हरिदास सोनवणे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, गिरीश फोंडे, बाळासाहेब सरनाईक, स्मिता गवळी, सुप्रिया साळोखे, मानसिंग बोंद्रे, सचिन चव्हाण, संजय मोहिते, राहूल माने, आदिल फरास, महेश सावंत, अभिषेक शिंपी  विक्रांत पाटील, शाहू काटकर, मधुकर देसाई, काँग्रेसचे माजी नगरसेवक, विविध तरुण मंडळे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी  प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

▪️विविध सामाजिक उपक्रम
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने 'देवूया गरजूना साथ, वाढदिनी मदतीचा हात' या उपक्रमांतर्गत कार्यकर्ते व विविध संस्थांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. इचलरकंजी काँग्रेस कमिटीच्या वतीने अब्दुललाट येथील बालोद्यान वस्तीगृहात अनाथ मुलांना अन्नदान वाटप व इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने बालकल्याण संकुल येथे अन्नदान करण्यात आले. माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांच्या वतीने कलिंगड वाटप करण्यात आले. रामकृष्ण (बंडू) जाधव यांच्यावतीने  कसबा बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  


▪️६ लाखाहून अधिक वह्या संकलित
 गेली १५ वर्षे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ ऐवजी वह्यांच्या स्वरूपात  शुभेच्छा स्वीकारण्याचा उपक्रम आमदार सतेज पाटील यांच्याकडून राबवला जातो. या उपक्रमाला यावर्षीही  प्रचंड प्रतिसाद लाभला. यामध्ये ६ लाखाहून अधिक वह्या संकलीत झाल्या. 

 ▪️गर्दीचा महापूर
सर्वसामान्य जनतेचे लाडके नेते आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी 'यशवंत निवास' समोर अक्षरशः गर्दीचा महापूर उसळला होता. विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शुभेच्छा देण्यासाठी सायंकाळी ४ वाजल्यापासून रात्री साडेनऊ पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

▪️वृद्ध नागरिकांच्या शुभेच्छा
मातोश्री वृद्धाश्रमातील सदस्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वृद्ध महिला पुरुषांची ही भेट व त्यांच्या शुभेच्छा अत्यंत भावस्पर्शी ठरल्या.


▪️गुळाची तुला 
शिव शाहू मुस्लिम संघटना यांच्यावतीने सतेज पाटील यांच्या वजणाइतकी गुळाची तुला केली. यावेळी या गुळाचे वाटप करण्यात आले. यावेळी तोफीक मुलाणी, झाकीर कुरणे, अमर समर्थ, मुस्ताक मलबारी, प्रवीण पुजारी, रियाज सुभेदार, अख्तर इनामदार, मुजीफ महात उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes