SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्वच्छता मोहिमेत 25 टण प्लास्टिक, तणकट व खरमाती उठावटाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून पाहणीराष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवडडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशनगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा; अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण; श्री. महादेव दूध संस्थेची याचिका फेटाळलीपुणे विभागातील पहिले खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय वारणेत! ८० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू : आमदार विनय कोरेशिवाजी विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी‘डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींची नेदरलँडमधील सॅक्सॉन युनिव्हर्सिटीत दैदिप्यमान कामगिरी’बालकामगार : कारणे, परिणाम आणि उपाययोजनाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज: एक युगद्रष्टा समाजसुधारक

जाहिरात

 

७० हजारांची लाच; पंटर सापडला, कॉन्स्टेबल पसार

schedule01 Nov 25 person by visibility 430 categoryगुन्हे

कोल्हापूर : महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताह सुरू असतानाच शनिवारी (दि. १) दुपारी कारवाई करण्यात आली हुपरी येथील जुगार अड्डयावर केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी ७० हजारांची लाच घेणारा पंटर रणजित आनंदा बिरांजे (वय ३८, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. पट्टणकोडोली येथे बिरांजे याच्या घरीच ही कारवाई झाली. दरम्यान पंटरकडून लाचेची मागणी करणारा पोलिस कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे याचा शोध सुरू आहे. 

 हुपरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल संदेश शेटे याने अन्य दोन अंमलदारांसह गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी हुपरी येथील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीकडे एक लाखाच्या लाचेची मागणी केली होती.  तडजोडीअंती ७० हजार रुपये पंटर रणजित बिरांजे याच्याकडे देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. 

 बिरांजे याने तक्रारदारास पट्टणकोडोली येथील घरीच लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने शनिवारी दुपारी बिरांजे याच्या घराजवळ सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ त्याला पकडले. पंटरकरवी लाचेची मागणी करणारा पोलिस कॉन्स्टेबल शेटे  पोलिस ठाण्यात मिळाला नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes