SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

घोडावत विद्यापीठातील दोनशेहून विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट

schedule16 May 25 person by visibility 594 categoryशैक्षणिक

अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठाने या वर्षीही चांगल्या प्लेसमेंटची परंपरा कायम राखत 2024-25 अकॅडेमिक वर्ष संपण्याचा आधीच २०० हुन अधिक  विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी प्राप्त करून दिली. अभियांत्रिकी, एम.बी.ए, फार्मसी, सायन्स, एम.सी.ए, बी.सी.ए या सारख्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.

विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी ट्रैनिंग अँड प्लेसमेन्ट विभाग कार्यरत आहे. या विभागातर्फे इंडस्ट्री रेडी इंजिनिर्स व बिझिनेस रेडी प्रोफेशनल्स तयार करणे हे उद्दिष्ठ्य ठेवून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्यांची प्लेसमेंटसाठी तयारी दुसऱ्या वर्षापासून सुरु होते. यामध्ये सॉफ्ट स्किल्स, ऍपटीट्युड टेस्ट्स, इंटरव्हियू   स्किल्स, पेर्सोनालिटी डेव्हलोपमेंट या बरोबर डोमेन विषय याचा समावेश असतो. यासाठी विद्यापीठ व बाहेरील तज्ञ नेमले जातात. 

या वर्षी विद्यार्थ्यांची विप्रो, आई टी सी, जेड ग्लोबल, ग्लोबल स्पेस, आर स्वेअर सॉफ्ट, आबोट लॅब्स, सिप्ला, हायटेक डिजिटल सोलुशन, एमीकॉम, एमिप्रो, वेलनेस फॉरेव्हर, घोडावत ग्रुप, ऐरोचाम्प एविएशन या सारख्या व इतर अनेक कंपन्यांमध्ये निवड झाली.

विद्यार्थ्यांच्या झालेल्या निवडी बद्दल  विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

 विद्यार्थ्यांना ट्रैनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. एन.व्ही पुजारी, डे. टीपीओ  मिलिंद पाटील, विविध विभागांचे विभागप्रमुख  व  टीपीओ समन्वयकांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes