SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात १२ एप्रिल रोजी ब्राह्मण शेतकरी मेळावाजागतिक रोमा दिन: उपेक्षितांच्या अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा उत्सवडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे वॉलचंद कॉलेज येथील स्ट्रक्चर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिससीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी...'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागरबळीराजा पाणंद रस्त्यांसाठी ३० दिवसांत पाहणी व प्रस्ताव सादर करा; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे निर्देशजनता दरबारामधील तक्रारीच्या अनुषंगाने महापौर रुपाराणी निकम यांची सुर्वे नगर परिसरात पाहणीकोल्हापुरात स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; १२ मोटार सायकलींसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

खासदार धनंजय महाडिकांचा पुढाकार! आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मानधन रचनेत बदल करण्याची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

schedule06 Apr 26 person by visibility 302 categoryराज्य

नवी दिल्ली : राज्यातील सीएचओएस संघटनेकडून शासनाकडे  मानधन रचनेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या सीएचओएस म्हणजे डॉक्टर आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे कर्मचारी यांना दरमहा ४० हजार रुपये मानधन दिले जाते, ज्यामध्ये २५ हजार रुपये निश्चित वेतन आणि १५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता असतो. मात्र, नव्या प्रस्तावानुसार ही रचना बदलून, ३५ हजार रुपये निश्चित वेतन आणि ५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता अशी करण्यात यावी, अशी मागणी होतीय. या बदलामुळे ग्रामीण भागात सेवा देणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. 

या प्रस्तावाबाबत महाराष्ट्र शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी द्यावी, अशी विनंती खासदार महाडिक यांनी, नामदार नड्डा यांच्याकडे केली.

 दरम्यान, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले कर्मचारी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. माता आणि बाल आरोग्य, आजारांचे स्क्रिनिंग आणि जनजागृतीमध्ये त्यांचे मोठे योगदान असते. त्यामुळे केंद्र सरकारकडून या कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे सकारात्मक लक्ष द्यावे, अशी विनंती खासदार महाडिक यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes