एचएमपीव्ही (HMPV) बाबत नागरिकांनी काळजी करु नये, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे : प्रकाश आबिटकर
schedule06 Jan 25 person by visibility 226 categoryआरोग्य
कोल्हापूर : जिल्ह्यातल्या एकूणच सगळ्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना जाहीर केल्या असून याबाबत बैठक होणार आहे. एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसचा बेंगलोरमध्ये जरी एक रुग्ण सापडला असला तरी त्यामुळे कोणती काळजी करायची गरज नाही.
आरोग्य विभागाच्या आवश्यकत्या सूचनांचे पालन करणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेणे या सगळ्या गोष्टी करण्याबद्दल सर्वप्रथम सर्व नागरिकांना सूचना करण्यात येत आहेत.
अशी माहिती सार्वजानिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहे.