SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा : विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिरनेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत९८ लाखांच्या गंडा घालणारा 'लाईफमार्क'चा ठग जेरबंद! नाव बदलून लपलेल्या मुख्य संचालकासह एजंट पोलिसांच्या जाळ्यातकरवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहातरंकाळा प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली १२ कोटींचा ढपला पाडण्याचा घाट; शिवसेनेचा संतप्त सवाल - 'बहुतेक कोल्हापुरात एलियन्स आले की काय?'"युवकांनी एड्स मुक्तीचे दूत बनावे”पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे लोकनृत्य महोत्सवातून राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे पालक सभा उत्साहात; विद्यार्थिनींच्या प्रगतीचे पालकांकडून कौतुकमहिला समानता दिन: समानतेच्या हक्काची आणि प्रगतीची नवी क्षितिजे

जाहिरात

 

विवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रम

schedule11 Jul 26 person by visibility 367 categoryसामाजिक

कोल्हापूर  : कोल्हापूरमध्ये एका विवाह सोहळ्यात अनोखा सामाजिक पायंडा पाडण्यात आला आहे. सिद्धार्थ सुधर्म वाझे आणि रक्षता खटावकर यांच्या विवाहप्रसंगी आहेर, भेटवस्तू किंवा पाकिटे न स्वीकारता ती रक्कम अंधशाळेला देण्याचे आवाहन वाझे परिवाराने केले होते. सुधर्म वाझे यांचे वडील कै. हिंदुराव वाझे हे अनेक वर्षे ज्ञान प्रबोधन संचलित अंधशाळेच्या कार्याशी जोडलेले होते. वडिलांनी घालून दिलेला समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी वाझे परिवाराने हा पुढाकार घेतला होता. 

त्यांच्या या आवाहनाला मित्र आणि नातेवाईकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, लग्नानंतरही सहा महिने मदतीचा ओघ सुरू राहिल्याने तब्बल सव्वा लाख रुपयांची रक्कम जमा झाली.

जमा झालेली ही मदत शनिवारी एका विशेष कार्यक्रमात अंधशाळेकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना नेते सत्यजित नाना कदम, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आदिल फरास, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक अश्किन आजरेकर, नगरसेविका दिपा अजित ठाणेकर, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, समाजमित्र डॉ. संदिप पाटील व बाबा महाडिक, उद्योगपती अभय देशपांडे, दिलीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय विविध सामाजिक ग्रुपचे सदस्यही याप्रसंगी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुहास बोन्द्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ नलावडे यांनी पार पाडले. समाजातील उपेक्षित अंधमुलांच्या मदतीसाठी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आणि त्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सुधर्म हिंदुराव वाझे यांनी सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत. वाझे परिवाराच्या या कृतीमुळे कोल्हापुरात सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes