काँग्रेसचे निष्ठावंत नेते पी. एन. पाटील यांच्या 72 व्या जयंतीदिनी अभिवादन
schedule06 Jan 25 person by visibility 318 categoryसामाजिक
कोल्हापूर : काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या 72 व्या जयंतीदिनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अभिवादन करण्यात आले यावेळी खासदार शाहु छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, पी. एन. पाटील यांनी जोपासलेला काँग्रेसचा विचार पुढे नेण्यासाठी आपल्याला एकजुटीने काम केले पाहिजे. ही विचारांची लढाई आपल्यालाच लढायची असून अशा प्रकारचा निर्धार आज पी एन पाटील यांच्या जयंतीदिनी आपण करूया अशी भावना व्यक्त केली. तसेच अन्य मान्यवरांनी ही पी एन पाटील यांच्या विषयी भावना व्यक्त केल्या.
यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजय बाबा घाटगे, के. पी. पाटील यांच्यासह राजेश पाटील, राहुल पाटील तसेच राष्ट्रवादीचे व्हि. बी. पाटील, शेकापचे बाबुराव कदम, कॉ. दिलीप पवार, कॉ. उदय नारकर, कॉ. सतीशचंद्र कांबळे, वसंतराव पाटील, डी. जी. भास्कर, भारतीताई पवार, विश्वास पाटील (आबाजी), बाळासाहेब सरनाईक, बाजीराव पाटील, राहुल देसाई, शिवाजीराव पाटील, धैर्यशील पाटील- कौलवकर, बी. के. डोंगळे, सदाशिवराव चरापले, सुधीर देसाई, युवराज पाटील यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक, जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, बाजार समितीचे संचालक आणि इंडिया व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.