डीकेटीईच्या विद्यार्थींनींची तलवारबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी
schedule25 Sep 25 person by visibility 156 categoryक्रीडा

इचलकरंजी : डीकेटीईचे टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिूटच्या तिस-या वर्षातील शिकत असणाा-या श्रध्दा सचिन खोत व अपुर्वा राजीव शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठाद्वारे आयोजित तलवारबाजी या स्पर्धेमध्ये सहभाग घेवून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहेे तसेच त्यांची ऑल इंडिया तलवारबाजी अमृतसर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे डीकेटीईच्या विद्यार्थानींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सांगली येथे संपन्न झालेलया अंतरविभागीय स्तरावरील तलवारबाजी स्पर्धेत डीकेटीईच्या विद्यार्थंनीनी प्रथम व दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस संपादन केले आहे. विद्यार्थींनीना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळामध्ये सहभागी होण्यासाठी डीकेटीईकडून वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात येते यामुळेच येथील विद्यार्थी अशा स्पर्ध्येमध्ये विविध कला गुणांचे सादरीकरण करुण आपला ठसा अशा स्पर्धेमध्ये उमटवतात यामुळेच इचलकरंजी आणि डीकेटीईचे नांव अशा विविध स्पर्धेमध्ये सन्मानाने घेतले जाते.
विजयी विद्यार्थींनींस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाना आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थीनीस संचालिका प्रा. डॉ. एल.एस. अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु जे पाटील, स्पोर्टस इनचार्ज ओंकार खानाज यांचे मार्गदर्शन लाभले.