कोल्हापूर महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना महिन्यातील 26 दिवस काम मिळणार : बीआरएस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या पाठपुराव्यास यश ; बीआरएस नेते संजय पाटील यांची माहिती
schedule09 Aug 23 person by visibility 1010 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेने रिक्त पदे न भरल्यामुळे रोजंदारी कामगारांच्या भरवशावर कामकाज चालू आहे. आरोग्य विभाग ,पवडी विभाग पाणीपुरवठा विभाग यामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे 600 च्या आसपास आहे. या कर्मचाऱ्यांना विशेषता शहराला पाणी सोडण्यासाठी तसेच ड्रेनेज सफाईसाठी रोजंदारी कामगार यांच्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना प्रशासकांमार्फत आदेश काढून 26 दिवसां ऐवजी 18 दिवस काम करण्याचा फतवा काढला आहे जर हा आदेश मागे घेऊन 18 दिवस ऐवजी 26 दिवस काम न दिल्यास महापालिकेचे कामकाज बी आर एस पक्षाच्या वतीने गुरुवारी बंद पाडण्यात येईल . असा इशारा निवेदनाद्वारे पक्षातर्फे देण्यात आला होता दरम्यान अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार महानगरपालिकेकडे जो अहवाल आला आहे त्या अनुषंगाने वर्कलोड आहे आणि कर्मचाऱ्यांना वाढीव दिवस द्यायला काही हरकत नाही. असा अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी तथा प्रशासक यांना सादर करणार आहोत त्यांची मंजुरी मिळाली की कर्मचाऱ्यांना वाढीव दिवस काम मिळेल यामुळे सकारात्मक निर्णय घेण्यात येईल यामुळे आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये पाणीपुरवठा विभागामध्ये पाणी सोडण्यासाठी जवळपास 100 रोजंदारी असून, सफाईसाठी 280 कर्मचारी कार्यरत आहेत ते जर संपावर केले तर शहरवासीयांना प्रचंड मानसिक त्रास होणार आहे किंबहुना पाणी आणि आरोग्य विभागामुळे शहरवासीयांची कुचुंबना होणार आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार गुरुवारपासून त्यांना काम देता येणार नाही जर हा निर्णय तातडीने जिल्हाधिकारी तथा प्रशासक व अतिरिक्त आयुक्त यांनी तातडीने न सोडवला तर आम्हाला उग्र आंदोलन करून प्रशासकीय कामकाज उद्या बंद पाडावे लागेल असा इशारा पक्षातर्फे देण्यात आला होता.
निवेदनाच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सायंकाळी झालेल्या चर्चेनुसार कर्मचाऱ्यांना वाढीव दिवस काम देण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
बी आर एस पक्षनेते संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तोहिद बक्षू, संग्राम जाधव, दिलीप चव्हाण, विक्रम जरग, प्रकाश पाटील, साईराज पाटील, सौरभ पवार, तानाजी मोरे, रोहित जाधव, विशाल जाधव, यांचा शिष्टमंडळात समावेश होता.