SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागल तालुक्यातील सहा 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात वॉकेथॉनसहकारी बँकिंग तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा: महाव्यवस्थापक सर्वानन एम.सायबर महाविद्यालयात वारांगना सखी संघटनेसोबत राखी पौर्णिमा उत्साहात राष्ट्रीय क्रीडा दिन : खेळांमुळे घडते सक्षम राष्ट्र भागीरथी महिला संस्थेतर्फे कळंबा आणि बिंदू चौक कारागृहातील बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रमवाशी नाका फायरिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश खाडे अखेर गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईबिष्णोई ००७ गँगचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड कोल्हापुरात जेरबंद! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची थरारक कारवाईडीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांनींची अ‍ॅलेक्स मशिनटूल्स या कंपनीमध्ये निवडकाळम्मावाडी सबस्टेशनवरील महावितरणच्या कामामुळे 31 ऑगस्ट रोजी कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने

जाहिरात

 

डॉ. तारा भवाळकर या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक, साहित्यिक; कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे गौरवोद्गार; विद्यापीठाच्या वतीने केला सत्कार

schedule13 Oct 24 person by visibility 806 categoryसामाजिक

कोल्हापूर : मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित झाला असतानाच डॉ. तारा भवाळकर यांच्यासारख्या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक-साहित्यिकेची नवी दिल्ली येथे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हा अत्यंत चांगला संकेत असल्याचे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल (दि. १२) सांगली येथे काढले.

नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक व समीक्षक असलेल्या डॉ. तारा भवाळकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्या निमित्ताने आज कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन शिवाजी विद्यापीठाच्या वतीने अभिनंदन व सत्कार केला. त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, मराठी साहित्य संमेलनाच्या शतकभराच्या वाटचालीमध्ये अवघ्या सहा महिलांना अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये डॉ. भवाळकर यांचा समावेश झाला, ही अतीव अभिमानाची बाब आहे. त्यातही नवी दिल्ली येथे यापूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ तत्त्वज्ञ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. त्यानंतर आता डॉ. भवाळकर या देशाच्या राजधानीमधून जगभरातील मराठी भाषिकांना आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे संबोधित करतील, ही मराठी भाषेच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना ठरेल.

डॉ. भवाळकर यांनी शिवाजी विद्यापीठाशी माझा खूप जुना स्नेह आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने कुलगुरूंनी केलेला गौरव हा मला माझ्या कुटुंबियांनीच केला आहे, अशी आपली भावना असल्याचे कृतज्ञतापर उद्गार काढले.

यावेळी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अविनाश सप्रे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes