SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नाटो (NATO): जागतिक सुरक्षिततेचे अभेद्य कवच आणि ७७ वर्षांचा प्रवासरंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागरसी. पी. आर. चे नूतनीकरण एप्रिल अखेर पूर्ण करून एक मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देशपोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीरससेगाव येथे २५ लाख रुपयांच्या विकासकामांचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजलीकोल्हापुरात 'गुड फ्रायडे' निमित्त ख्रिस्ती बांधवांकडून विशेष प्रार्थना; चर्चमध्ये भाविकांची गर्दीशिधावाटप विभागाचा मोठा धडाका! वैजापूर रोडवर LPG चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्तगुड फ्रायडे : त्याग, क्षमा आणि करुणेचा दिवस

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेला आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुण्यात बदली, डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे धुरा!

schedule02 Apr 26 person by visibility 317 category

कोल्हापूर : राज्य शासनाने आज प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे फेरबदल केले असून, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती के. मंजुलक्ष्मी (IAS) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता डॉ. राजेंद्र भारूड (IAS) यांची कोल्हापूर महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) येथे 'अतिरिक्त आयुक्त' या रिक्त पदावर करण्यात आली आहे. त्यांनी आपला सध्याचा पदभार डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सोपवून तातडीने नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

नूतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड हे यापूर्वी मुंबई येथे 'राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान' (RUSA) चे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा आता कोल्हापूर शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात या बदल्यांची मोठी चर्चा सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes