SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळातर्फे नागाळा पार्कमध्ये १९ ऑक्टोबरला भव्य दांडिया सोहळा!पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक भरतीसाठी कटिबद्ध; रिक्त पदांची १०० टक्के भरती करण्यासाठी पाठपुरावा करणार : कौस्तुभ गावडेजागतिक अन्न दिन: अन्नाची नासाडी रोखण्याची आणि भूकमुक्तीची प्रतिज्ञागांधीनगरमध्ये टायर पेटवून रिपब्लिकन पक्षाचा जोरदार ‘रास्ता रोको’!पोस्ट ऑफिसमधून दिवाळीचा फराळ परदेशात पाठविणे आता अधिक सुलभसौदत्ती येथे गोकुळच्या ठरावधारकांना शपथ देऊन दबाव आणण्याच्या प्रकाराची चौकशी कराकोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 71 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईकायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर शासन जबाबदार : आ. सतेज पाटीलकोल्हापूर : सीपीआरमधील औषधांचा तुटवडा आणि नूतनीकरण घोटाळ्याविरोधात बाळासाहेब बेलेकर आक्रमक, उपोषणाचा इशारादुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

जाहिरात

 

प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी संपवले जीवन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

schedule03 Nov 24 person by visibility 850 categoryगुन्हे

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. ५२ वर्षीय कन्नडचे दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवले. गुरुप्रसाद यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 कर्नाटकातील मदनैयाकहल्ली भागातील त्यांच्या घरात गुरुप्रसाद यांचा मृतदेह सापडला. गुरुप्रसाद मागील ८ महिन्यांपासून त्या घरात राहत होते. दिग्दर्शकांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना घरातून दुर्गंध येत होता. यामुळे त्यांच्या शेजारी लोकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस तपासात घरात कुजलेल्या अवस्थेत गुरुप्रसाद यांचा मृतदेह आढळून आला. .पोलीस दिग्दर्शक गुरुप्रसाद यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी त्यांचा मृतदेह पंख्याला लटकेल्या अवस्थेत सापडला. 

 गुरुप्रसाद यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचा तपास करण्यात येत आहे. गुरुप्रसाद हे कर्जात बुडाले होते. त्यांना गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. यामुळे दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes