SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पोस्ट ऑफिसमधून दिवाळीचा फराळ परदेशात पाठविणे आता अधिक सुलभसौदत्ती येथे गोकुळच्या ठरावधारकांना शपथ देऊन दबाव आणण्याच्या प्रकाराची चौकशी कराकोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 71 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईकायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर शासन जबाबदार : आ. सतेज पाटीलकोल्हापूर : सीपीआरमधील औषधांचा तुटवडा आणि नूतनीकरण घोटाळ्याविरोधात बाळासाहेब बेलेकर आक्रमक, उपोषणाचा इशारादुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदनशाही दसरा महोत्सव: महिलांच्या बाईक रॅलीतून दिला सामाजिक संदेश'टाटा पॉवर' मध्ये येथील नामांकित केआयटीच्या तब्बल २६ विद्यार्थ्यांची घवघवीत निवड​"कळंब्यात मध्यरात्री बिबट्याचा वावर; मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण!"वाचन प्रेरणा दिन: ज्ञानाची क्षितिजे आणि प्रगतीचा पाया

जाहिरात

 

प्रजासत्ताक दिनी आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते ध्वजारोहण

schedule23 Jan 25 person by visibility 958 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात प्रकाश आबिटकर, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता छत्रपती शाहू स्टेडीयम, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व शहिद जवानांचे कुटुंब यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.

 मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी  दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 8.30 ते 10 वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी  किंवा 10 वाजल्यानंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes