SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!गोकुळ दूध संघ निवडणूक : आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे बजावला मतदानाचा हक्कजागतिक रजोनिवृत्ती दिन: महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकतासेवा संकल्प अभियाना अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय गांधीनगर येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर मार्फत 'फोकस ग्रुप डिस्कशन' चे आयोजनसोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी; कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा वाढता पाठिंबा!पात्र शाळा व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; सर्व पात्र संस्थांना १००% पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेशारंगधर देशमुख यांच्या सोबतीने महायुती मजबूत : चंद्रकांतदादा पाटीलखासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारककर्करुग्णांसाठी मोठा दिलासा विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेशपदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्क

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त खाद्य महोत्सव 2024 चे आयोजन

schedule11 Dec 24 person by visibility 1430 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या 15 डिसेंबर रोजी वर्धापन दिनानिमित्य दर वर्षी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही शुक्रवार दि.13 ते रविवार दि.15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत ताराबाई पार्क, सासणे ग्राऊंड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या खाद्य महोस्तवात 100 स्टॉलचे नियोजन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. खाद्य पदार्थ बरोबरच महिला बचत गटानी बनवलेल्या विविध वस्तूंचीही विक्री व  प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

 कोल्हापूर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील इतर नगर परिषद, नगरपालिकांमधील नावीन्य पूर्ण उत्पादने असणारे महिला बचत गट यामध्ये सहभागी होणार आहेत.

  या महोत्सवात खाद्य पदार्थामध्ये वडा कोंबडा, तांबडा पांढरा रस्सा, बिर्याणी, पूरण पोळी, खांडोळी, रक्ती मुंडी, मटणाचे लोणचे, झुणका भाकरी, भरीत भाकरी, पाणीपुरी, स्प्रिंग पोट्याटो, चिकन शोरमा, आंबोळी, दावणगिरी डोसा, पावभाजी, BBQ, मोमोज, सँडविच, कोंकणी पदार्थ, सर्व प्रकारचे पापड, लोणचे अशा विविध पदार्थांचा आस्वात सर्वांना घेता येणार आहे.  त्याचबरोबर बचत गटानी बनवलेले कोल्हापुरी चप्पल, मातीच्या वस्तु, बांबूच्या वस्तु, हस्तकला वस्तु, रोपवाटिका, हँडमेड ज्वेलरी, नॅपकिन बुके, बांगड्या, ज्वेलरी, चिमणी घरटे उत्पादक, बांगड्या, ज्वेलरी, पर्स, बॅग अशा विविध वस्तु विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. 

तरी सर्व कोल्हापूर वासीयानी या महोत्सवास भेट देऊन या महोत्सवातील विविध पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes